मी माझ्यापुरता लावलेला अर्थ असा आहे..
माझ्या अस्तित्वावर,आचार,विचार,उच्चारांवर प्रभाव असणारे असे घटक की ज्यांची निवड मी केलेली नाही.
असं काहीच माझ्याबाबतीत नाही आणि (म्हणून) माझ्यावर कोणतंच ओझं नाही असं म्हणणं अशक्यच आहे.
तर ही ओझी मला काचतात का ?
कधीकधी काचतातही पण एकूणात विचार केला तर सध्याच्या समाजरचनेत माझ्यावरची ओझी लाभदायीच आहेत.
मी माझ्या ओझ्यांबद्दल काही तक्रार करणं म्हणजे खरोखरीच शोषित/वंचित असे जे समाजगट/व्यक्ती आहेत त्यांच्या ओझ्यांची चेष्टा केल्यासारखं आहे असं मला वाटतं.
मी पुरुष म्हणून जन्माला आलो, ब्राह्मण जातीत जन्माला आलो, सरासरीच्या वरची बुद्धिमत्ता आहे, आर्थिक परिस्थिती चांगली होती/उत्तम आहे वगैरे वगैरे.
कोणतेही निकष लावून उतरंड मांडली तर मी त्यात privileged elite या गटात असणार आहे. माझ्या काही विशेषाधिकारांचे थोडेफार आनुषंगिक तोटे नक्कीच आहेत...
"The best years of your life are the ones in which you decide your problems are your own.You do not blame them on your mother, the ecology, or the president. You realize that you control your own destiny."
Albert Ellis
-- मिलिन्द
>>मी माझ्या ओझ्यांबद्दल काही तक्रार करणं म्हणजे खरोखरीच शोषित/वंचित असे जे समाजगट/व्यक्ती आहेत त्यांच्या ओझ्यांची चेष्टा केल्यासारखं आहे असं मला वाटतं.
ReplyDeleteओझ्यांबद्दल लिहिणं म्हणजे केवळ तक्रार करणं , असंच असतं का?
आपल्याला मिळालेल्या गोष्टींची जाणीव असून सुद्धा, ओझ्यांबद्दल लिहिता येईलच की. ते तू टाळलं आहेस.
या ब्लॉगवर जेव्हा ओझ्यांबद्दल, असमानतेबद्दल, असुरक्षिततेबद्दल, अपमानांबद्दल लिहिलं जातं तेव्हा ती कुणाही वंचिताची चेष्टा केलेली नसते.
तुझ्या मतानुसार उच्चवर्गीय, उच्चवर्णीय, उच्चशिक्षित बाईने तिला काचणार्या गोष्टींबद्दल लिहिणं म्हणजे निम्नवर्गीय. निम्नवर्णीय, निरक्षर बाईची चेष्टा करणं आहे?
नाही. तसं नाही ते.
>>कोणतेही निकष लावून उतरंड मांडली तर मी त्यात privileged elite या गटात असणार आहे.
आहे या समाजपरीस्थितीत तू समाधानी आहेस तर?
वंचितांच्या तुलनेने त्याची ओझी बाऊ करण्यासारखी नाही इतकच!
ReplyDelete>> माझ्या अस्तित्वावर,आचार,विचार,उच्चारांवर प्रभाव असणारे असे घटक की ज्यांची निवड मी केलेली नाही.
व्याख्या अचूक..