हे चित्र मला फार आवडलं आहे.
ही तरुणी पाय पोटाशी घेऊन पुस्तक वाचत बसली आहे.
छान सजून, तयार होऊन बसली आहे.
आपण पुस्तक वाचायला असं सज - धजके बसतो का? नाही.
जर कुणी पुस्तक वाचण्याचा सोहळा करण्या आधी आवरत असेल तर भारीच!!
आपण असं तयार कधी बरं होतो? काही सण, समारंभ, कार्यक्रम असेल तर... नवीन कपडे.. सळसळते... नाजूकसा गजरा..अंबाड्याभोवती... हातात बांगड्या, छानशी अंगठी... ओढणी सुद्धा घेतलेली आहे...
हिच्याही घरी तसंच काही असेल कदाचित , एखादा सण...
कदाचित तिचं लग्न झालेलं आहे... कदाचित नाही.
ती कुठल्या जाती, धर्माची आहे? कुठल्याही... महत्त्वाचं.. ती स्त्री आहे आणि ती वाचत बसली आहे.
नुसती वाचते आहे असं नाही.. शेजारी वाफाळता कप आहे... वाचण्याचा सोहळा सुरू आहे.
सणादिवशी सगळे जमले आहेत, नातेवाईक.. मित्र - मैत्रिणी... काहीतरी हसणं, खेळणं.. मजा चालू असेल... बाहेरच्या खोलीत, अंगणात...
हिला मात्र ओढ लागलेली पुस्तकातल्या गोष्टींची.. कदाचित पुढे काय होईल? ची... आपली ही नायिका आहेच नादिष्ट.. मन मानेल तसं करणारी... त्या बाहेरच्या सगळ्यांना सोडून ती आतल्या खोलीत आली आहे... स्वतः च्या, स्वतः ला हव्याशा जागेत... घरातल्या आणि मनातल्याही!! येताना मस्त गरम चहा किंवा कॉफीचा कप घेऊन आली आहे .
किती सुंदर चित्र आहे हे!!!
तुम्हाला, मला, आपल्या सगळ्यांना असं आपल्या या नायिकेसारखं, मनाला वाटेल तेव्हा... वाचनाचा सोहळा करता यावा, याच महिला दिनाच्या शुभेच्छा!! 🌹🌹 - विद्या कुळकर्णी ( हे बोहो पद्धतीचं चित्र आहे, प्रीती या चित्रकर्तीचं, हे मला नेटवर भेटलं.) |
खूपच छान विचार.
ReplyDelete