Thursday, March 25, 2010

निर्मिती

अखेर तो दीवस उजाडतो. पोटात बारीक बारीक कळा येऊ लागतात. पहील्या पहील्या कळा सहन होणा-या,सुखद
वाटणा-या.आपल्यातूनच एक नवीन जीव निर्माण होणार ही कल्पनाच मुळी केवढी आनंददायी आहे.त्यासाठी काही वाट्टॆल ते सहन करण्याची शक्ती प्रत्येक स्त्री मध्ये त्यावेळी कोठून येते कोण जाणे.मनात असंख्य विचार येत असतात. कसा असेल तो इवलासा जीव. नाक,डोळे हात, पाय,चेहरा,रंग.जावळ असेल का? का नसेलच?मुलगा का मुलगी? या आणि अश्या असंख्य कुतुहलापोटी,उत्सुकतेपोटी पडलेल्या प्रश्नात मोठी गंमत आहे.कालच भावजय बाळंत झाली तिच्यापाशी असताना असे अनेक गमतीशीर प्रश्न मनात येऊन गेले.स्वत:च्या वेळीही असे अनेक प्रश्न पडलेच होते. पण त्यावेळी कळा सहन करण्याचा भाग त्यामध्ये खूपच जास्त होता.त्यावेळेचे स्वत:वर येणारे दडपण हे त्या कुतुहलावर मात करत होते.काल जरा आजूबाजूला मला बघता आले. दर एक तासाने एक नर्स येत होती आणि तिच्या पोटावर छोटसं यंत्र लावून बाळाचे ठोके तपासत होती.एरवी या नर्सेस अगदी नॉर्मल चेह-याने वावरत असताना आपल्याला दीसतात.पण आपल्याच पेशंटपाशी आल्या की काय होत त्यांना कोणास ठाऊक. उगाचच गंभीर चेहरा करतात.तो त्यांचा चेहरा बघून आजूबाजूच्या नातेवाइकांना घाबरायला होत असते.किंबहूना आपणही दडपणाखाली असतो म्हणून तो तसा चेहरा बघुन अजुनच दडपणात भर पडते. हाच अनुभव तिला आत ऑपरेशन थेअटरमध्ये नेल्यावर.उगाचच सगळ्या नर्सेसची पळापळ.मध्येच आतून एखादी पळत येणार आणि गंभीर चेह-याने बाहेरच्या नर्सला ओरडतच अहो लवकर या पळा लवकर असे म्हणणार.हे सगळे गंभीर नाट्य बघुन बाहेर उभे रहणारे आपण उगाचच गंभीर होतो. आणि ही धावाधाव बघून ही सगळी धावाधाव आपल्याच आत असणा-या पेशंटसाठी चालली आहे असा तर्क काढत असतो. काही आत प्रॉब्लेम तर नाही ना? अशी उगाचच प्रत्येकाच्या मनात शंका येते.मधूनच एक वयस्कर आजी (नर्स)आतून येतात. त्यांना मी विचारलं आजी झाली का हो बाळंत? तर त्या म्हणाल्या हो आत्ताच.त्यांना म्हणलं काय झालं काही कळलं का? तर म्हणाल्या मला नाही सांगता येणार....परत या अर्धवट उत्तराने आम्ही उगाचच गंभीर.खरतर हॉस्पिटलचेही काही नियम असतील.पण त्या आजी असे म्हणल्यावर सगळं बर असेल ना आत? अशी उगाचच शंका येऊन गेली पुन्हा एकदा.हे सगळ फक्त चाललं होत ते मनातील दडपणामुळे.....साधारण दहा मिनीटे हे नाट्य चालले आणि डॉ. बाळाला हातात घेऊन बाहेर आले. तो नवा इवलासा जीव बघून सगळ्यांच्याच मनावरचे दडपण चुटकीसरशी गळून पडले. खरंच आयुष्याच्या प्रत्येक वळणावर प्रत्येक क्षणी अशी अनेक मनावर येणारी दडपणं ही केवळ आपल्या मुलांचे चेहरे बघून कुठच्या कुठे पळुन जातात हे काल मला पुन्हा एकदा प्रकर्षाने जाणवले.

1 comment:

 1. दीपा,
  मी कधी कुणासाठी ऑपरेशन थिएटर बाहेर थांबलेली नाही, पण आत असण्याचा अनुभव अर्थातच आहे. त्यावरून तुला सांगते आत काही धावपळ, ताण वगैरे नसतात, सगळं मजेत चाललेलं असतं, विशेषत: काही गंभीर परीस्थिती नसेल तर...
  माझे अनुभव सांगते, मला कधीही पूर्ण भूल दिलेली नव्हती आणि दर वेळी मी चांगली जागी होते.
  १) मुक्ताच्या वेळी- वर्ल्ड कप च्या मॅचेस चालू होत्या. भारत-ऑस्ट्रेलिया मला वाटतं उपान्त्य फेरीचा सामना चालू होता, माझ्या ऑपरेशनपेक्षा डॉक्टरांना भारताच्या जिंकण्या हरण्याचीच जास्त काळजी वाटत होती. त्याच गप्पा चालू होत्या.
  २) माझ्या इन्सीजनल हर्नियाच्या ऑपरेशनच्या वेळी, मदतनीस डॉक्टर तिच्या आवडीच्या गाण्यांची सीडी घेऊन आली होती, (ादल्या दिवशी विसरली होती) आल्या आल्या तिने सीडी लावली आणि माझे ऑपरेशन साग्रसंगीत!
  ३) सुहृदच्या वेळी- सगळ्या डॉक्टर मिळून मराठी माध्यम योग्य की इंग्रजी यावर चर्चा करत होत्या.

  *******
  जहाल स्त्रीवाद्यांनी आई होणं, मातृत्वाची मिथकं कशी तयार केली गेली हे दाखवून दिलं आणि त्यात काही ग्रेट नाही हे पण.
  मला आपलं वाटतं की मूल होणं ही आपल्यासाठी खरोखरच खूप आनंदाची घटना असते, (त्यासाठी जे सहन करावं लागतं ते खरंच त्रासाचं असतं) तरी या आनंदात मनाच्या एका कोपर्‍यात हे ही असलं पाहिजे की समाजाच्या दृष्टीने रोज कितीतरी बाळं जन्मत असतात. म्हणजे आनंदाचा समतोल साधता येईल.

  ReplyDelete

आतलं जग

श्रीदेवीला सारख्या कॉस्मेटीक सर्जर्‍या करून आपलं वय लपवावं असं वाटण्यामागे  काय असेल? असुरक्षितता, भीती, self accepatance  नाही, self lo...