साध्या मध्यमवर्गीय कुटुंबातले माधव आणि भक्ती. पस्तीशी गाठलेले, अविवाहित. एकटेही आणि एकाकीही. दोघे इंटरनेट च्या माध्यमातून बोलत असतात. त्या आभासी, स्वप्नातल्या जगात माधव असतो नाईट रायडर - काळा सूट, टाय, हॅट, गॉगल घालणारा, रुबाबदार. आणि भक्ती असते व्हाईट लिली देखणी, त्याच्या बोलण्यावर लाजणारी, त्याच्यावर जीव ओवाळून टाकणारी. मग दोघे लग्न करायचं ठरवतात. त्यासाठी प्रत्यक्ष भेटायचं ठरवतात. प्रत्यक्ष भेटीत मात्र ते भक्ती आणि माधवच असतात. दोघांनी चॅटिंग करताना घातलेले व्हाईट लिली आणि नाईट रायडरचे मुखवटे आता उपयोगाचेच नसतात. मग एकेका प्रसंगातून दोघांनाही एकमेकांची खरी ओळख होत जाते. व्हाईट लिलीच्या आवरणाखालची संशयी, सावध, आक्रमक भक्ती आणि नाईट रायडरच्या आवरणाखालचा चारचौघांसारखा, पोटापाण्याच्या मागे असलेला, टक्कल पडलेला माधव - दोघांनाही एकमेकांच्या स्वभावातली, विचारातली, सवयींमधली दरी जाणवू लागते. तडजोड दोघांनाही शक्य नसते. संवादाचा धागाच उरत नाही. शेवटी पुन्हा ते पूर्वीच्याच मुखवट्यांचा, स्वप्नातल्या जगाचा आधार घेतात आणि चॅटिंग द्वारे संवाद सुरु करतात. नाटक अजूनही बरंच काही सांगत होतं. मला लक्षात राहिलं ते व्हाईट लिली आणि नाईट रायडर झाल्याशिवाय त्यांना एकमेकांशी संवादच साधता न येणं.
नात्यांमधेही असं होतं का? कधी आपण समोरच्याला आपल्याला हवा तो मुखवटा घालू पाहतो कधी समोरच्याला हवा तसा मुखवटा आपण स्वतःला घालायचा प्रयत्न करतो. क्वचित कधी खरा चेहरा आणि तो मुखवटा एक असतात. क्वचितच कोणाला मुखवटे न घेता जगता येतं. पण कित्येकदा मात्र ते मुखवटेच आपली ओळख बनतात. ते मुखवटे जपण्याचा आपणही कसोशीने प्रयत्न करत राहतो.कित्येकदा समोरच्यानंही आपल्याला हव्या तशा मुखवट्यात स्वतःला बसवावं असाही प्रयत्न करतो. काही नात्यांच्या तर अपेक्षाच अशा असतात की मुखवटे चढवल्याशिवाय त्या पूर्णच करता येत नाहीत.
मुखवटे म्हणजे तडजोड. मुखवटे म्हणजे जे नाही ते आहे असं भासवणं.
आतून काही तुटत असेल, काही फुटून बाहेर येत असेल, डोळे वाहत असतील, चेहरा वेडावाकडा झाला असेल. पण मुखवटा असतो. तो हे काहीच उघडं पडू देत नाही. पुन्हा, जो मुखवटा चढवलेला/चढलेला असेल, त्याच्याशी सुसंगत असं, त्याला शोभेल असं वागणंही ओघानंच आलं. हे 'ज्याला जसे हवे तसे' मुखवटे आपण चढवले की खूपसे प्रश्न उत्तराची अपेक्षा न बाळगताच बाजूला जातात. कारण ते प्रश्न तर खऱ्या चेहऱ्यालाच पडलेले असतात. मुखवटा काही प्रश्न विचारतच नाही. तो तयार होतो तोच मुळी समोरच्याच्या प्रश्नाला उत्तर म्हणून. त्याच्या मागणीचा पुरवठा म्हणून.
कधीतरी कुठलातरी हळवा कोपरा दुखावला जातो, मुखवटा खळ्ळकन फुटतो. आतला वेगळाच अनोळखी चेहरा बाहेर येतो. त्याच्या मागण्या असतात. त्याचे प्रश्न असतात. त्याची स्वप्नं असतात. त्याच्या भावना असतात. पण समोरच्याला सवयच नसते त्या चेहऱ्याशी संवाद करण्याची. त्याला तो मुखवटाच सवयीचा आणि सोयीचा असतो. पुन्हा तो तुटलेला मुखवटा सांधायचा आणि चढवायचा. नीट पाहिलं तर चरे दिसतात त्याच्यावरचे नाहीतर असतोच तो पुन्हा 'ज्याला जसा हवा तसा.'

अश्विनी,
ReplyDeleteखरंच मुखवटे उतरून मोकळं होण्याजोगं एकही नातं आपल्याला मिळालं/ आपण मिळवलं नाही, तर ती शोकांतिकाच. विशेषत: नवरा-बायकोचं नातं जर असं होऊन बसलं तर काय करायचं?
मुखवटे तसे सोयीचे असतात, पण ते इतरांसाठी, आपल्यांसाठी नव्हे. खरा चेहरा ओळखण्यासाठी काही समानता वगैरे तत्वांची ओळख लागते असं नाही, हवी फक्त थोडी माणुसकी आणि संवेदनशीलता. (तुम इतना क्य़ूं मुस्कूरा रहे हो)
आपल्याला जर खरे चेहरे ओळखता यायला लागले तरी पंचाईतच होते. आपण खरा चेहरा शोधत असतो, त्याला प्रश्न विचारत असतो आणि मुखवटे आपल्याला”तयार उत्तरे’ (त्या मुखवट्याच्या नियमावलीतली) देत जातात. संवाद कसा होणार?
आपणसुद्धा मुखवटे उतरून ठेवायची सवय ठेवायला पाहिजे. ते जर चेहर्यालाच चिटकले तर??
आपण स्वत:ला आहोत तसं स्वीकारलं पाहिजे आणि नात्यांनाही जशी आहेत तशी स्वीकारली पाहिजेत. हे सोपं नाही पण अशक्यही नाही.
Definitely this is not impossible! One must look and behave as he/she is!
ReplyDeleteit is not at all difficult but you need to convince yourself for that. It is not difficult to speak truth because there is no need of manipulates and say what it is as it is! Similarly living without mask is easy but you find most of the people around you are in masks then one cannot make you mind accept it and you follow them and land in trouble and make your life more and more complicated! Know yourself and god given duties to you and then reject the mask and live free and live the constructive and creative life of real HUMAN!