नीरज, आनंद, धन्यवाद!
कमावणं म्हणजे नोकरीच आणि ती ही निरर्थकच असा विचार का करावा? आवडीच्या गोष्टींतून अर्थार्जन का करू नये?
मान्य! (सगळ्यांना ते शक्य नसते तरी मान्य!)
मी जी नोकरी करत होते ती तशी निरर्थकच होती, कुणी सांगावं मी ती करत राहिलेही असते. मी त्यासंदर्भात लिहिले आहे.
"कामाची विभागणी" हे तत्व महत्वाचं आहे.
मान्य़!
घरात येणार्या कमाईवर सगळ्यांचा हक्क आहे असे मानूया. मग काय करशील? समज प्रत्येकाच्या नावे त्याच्या/ तिच्या खात्यात ठरलेली रक्कम जमा केली, त्या पैशांवर त्या व्यक्तीचा हक्क, बरोबर आहे? म्हणजे ते पैसे ती व्यक्ती हवे तसे खर्च करू शकेल. (हे ही शक्य नसतं)
मग तर माझी समस्या सुटलीच नां! मी सध्या जे काम करते त्याचेच पैसे मला मिळायला लागले तर आर्थिक परावलंबन नाही (रूखरूख नाही)
तू ज्या वाटेने विचार करतो आहेस त्यासाठी मला तुझ्याबद्दल आदर वाटतो. पण हा एक सापळा आहे, नीरज. घर सांभाळून मला पैसे मिळायला लागले तर मी घराबाहेर कशासाठी पडायचं?
घरकामाला वेतन अशी चळवळ युरोपात झाली होती. काही देशांमधे तसे कायदेही झाले (कदाचित स्वित्झर्लंड किंवा स्वीडन) काही नवरे नियमितपणे घरकामाचा पगार आपल्या बायकांना देत असत. या आकृतिबंधामुळे असं झालं की त्या बायकांचं घरकाम पक्कं झालं, त्या घराशी बांधल्या गेल्या. जर त्या घरकामाचा पगार घेत आहेत तर घरकामात नवर्याच्या मदतीची अपेक्षाच नको. घरकाम हे तेच ते, कंटाळवाणे, कौशल्याची नाही तर वेळेची मागणी करणारे आहे. (मुलांकडे पूर्णवेळ लक्ष द्यावे लागते अशी कितीशी वर्षे असतात?) एकदा संसार मांडला आहे म्हणजे कुणालातरी घरकाम करावे लागणारच आहे, म्हणजे मदतनीसांचे साह्य घेऊन का असेना, त्यात अडकून राहावेच लागते. मग कौशल्याची, कस लागेल अशी, त्यांची वाढ होईल अशी, कामे त्यांच्या वाट्याला येतच नाहीत. व्यक्ती म्हणून त्यांचा विकास थांबवला जातो.
घरातल्या जास्तीत जास्त कामांसाठी बाईला मदत मिळायला हवी. छोट्या विभक्त कुटूंबांमुळे स्त्रीचा श्वास मोकळा झाला आहे पण तिच्यावरच्या घरातल्या जबाबदार्या वाढल्या आहेत, तात्पुरती तिची जबाबदारी उचलू शकेल असं कुणी नाही. ’घर मी चालवते/ माझ्यामुळे चालते’ च्या मुखवट्यामुळे कुठल्या कुठल्या प्रगतीच्या वाटा बंद कराव्या लागतात याची बाईला जाणीव नाही. पर्यायी व्यवस्था काय असावी? कुटूंबव्यवस्था कशी असावी? कम्यून असावीत का ? निकड निर्माण झाली की समाज उत्तरे शोधेलच.(बहुदा)
आता तर स्त्रियांवर इतका दबाव आहे (९० च्या उदारीकरणानंतर झालेले बदल....... यावर कधीतरी लिहिन.), तिने शिकलेलं असायला हवं, कुठल्यातरी कलेत पारंगत असायला हवं, चांगलं दिसायला हवं, घर व्यवस्थित ठेवायला हवं, मुलांच्या प्रगतीकडे लक्ष द्यायला हवं, नोकरी करायला हवी, घराबाहेरची कामे यायला हवीत....... ही यादी वाढती आहे.