तुम्ही जर एकत्र कुटुंबात रहात असाल अथवा पुरुष प्रधान घरात असाल तर तुम्ही कमावतं असणं आणि नसणं यावर तुमचं घरातलं स्थान निश्चितच अवलंबून असते असं मला नक्की वाटतं. काही एका रकमेच्या पुढील खर्च त्या कुटुंबातील प्रमुख व्यक्तीने घ्यायचा व त्यानंतर तो प्रस्ताव पटला तर तो मान्य करायचा यात त्या स्त्रीची स्वत:ची गरज, आवडनिवड,तिला काय वाटते हे मतच धरले जात नाही. आणि याचा आपण कमावते नाहीत याची एक बोचणी मनाला लागून रहाते. पिढ्यानपिढ्या हे असेच चालू राहील्याने या प्रवाहाविरुद्ध वागण्याला कोणीच पुढं येत नाही. आणि मग यात जी कमावती नसते तीची मात्र फरफट होत रहाते.आणि अगदी फालतू गोष्टींसाठी सतत कुटुंबातील कोणा न कोणा तरी व्यक्तीपुढे पैशांसाठी हात पसरावा लागतो.तर मोठे खर्च तर लांबच. यासगळ्यातून आपण आपल्याच माणसांचा आपल्यावर विश्वास नाही ही भावना सतत मनामध्ये घेऊन एक प्रकारची लाचारी आपल्या पदरात येते.मी कमावत नाही म्हणजे मी माझ्या कुटुंबासाठी काही एक स्वत:च्या चार गोष्टींचा त्याग करून घर संभाळते आहे. हे समोरच्याला सांगण्याचीही तिला गरज वाटत नाही. कारण समोरचा त्याच्या प्रत्येक कृतीतून तिला हे सतत दर्शवत असतो की तू काय जगावेगळं करतेस? आपल्या घरासाठीच करते. आणि हे केलेच पाहीजे.अशी त्या घरातील प्रत्येकाच्या वागणुकीतून तिला हे दिसत असते. आणि सतत ती आपल्या सेवेला आहे असे गृहीतच धरले जाते.का विश्वासाने एखादी ठराविक रक्कम तिच्या हाती सोपवली जात नाही. आणि ज्या अर्थी असे होत नाही त्या अर्थी तिने असे सतत तुमच्या पुढे पैशासाठी हात पसरलेले तुम्हाला चालतात. आणि कुठतरी आपण तिच्यापेक्षा श्रेष्ठ,कर्तृत्ववान अशी अहंकारी भावना त्या पुरुषाच्या मनात असते हे नक्की.आणि अश्यामुळेच एकाच घरातील कमावती आणि न कमावती अश्या दोन स्त्रीयांच्यात त्या घरातील इतरांचे वागणे हे वेगवेगळे असते. आणि घरातील माणसे जर असा भेदभाव करणारी असतील तर समाजातील इतरांचे काय म्हणावे.
सुखदुःखांचे,हळवे,कातर,हसरे,दुखरे,क्षण जपलेले. श्रावणातले जलबिंदू हे तया छेदिती प्रकाशकिरणे. प्रकाशकिरणांचे अंतर्मन नभी उमटवी इंद्रधनु. त्या रंगांचा गोफ साजिरा या गं सयांनो मिळुनि विणू.
Subscribe to:
Post Comments (Atom)
हिरो
माझ्या मैत्रिणीची एक मैत्रीण आहे. क्लार्क. आपलं काम प्रामाणिकपणे करणारी. कधीही कुठल्या कामाचे वरून किंवा टेबलाखालून असे पैसे तिने घेतले ना...
-
माझ्या मैत्रिणीची एक मैत्रीण आहे. क्लार्क. आपलं काम प्रामाणिकपणे करणारी. कधीही कुठल्या कामाचे वरून किंवा टेबलाखालून असे पैसे तिने घेतले ना...
-
यात्रा हे मुक्ता बाम लिखित दिग्दर्शित नाटक आहे. एकपात्री आहे, सुकन्या गुरव ने आक्काच्या भूमिकेचं सोनं केलं आहे. यात्रा ही आक्काची गोष्ट आह...
-
"स्त्री हीच स्त्रीची खरी शत्रू असते" असं वाक्य आपल्याला नेहमी ऐकायला मिळत... कधीकधी ते खंर आहे असं वाटायलादेखील लागतं. सासू-सून, ...
दीपा, अशा परीस्थितीत स्वत: कमवायला लागणे हा एक उपाय आहे.
ReplyDeleteदुसरा घरात लढणे, तो काही सोपा नाही, पण केला पाहिजे.
”घरातील माणसे जर असा भेदभाव करणारी असतील”...
घरातील माणसेही समाजाचा हिस्सा आहेत, त्यांना स्वीकारावं लागणार आहेच, पण ”आपण कसं असायचं आहे” हे आपण ठरवायचं. ते त्यांच्यावर अवलंबून ठेवू नये. एवढं स्वातंत्र्य आपल्याला हवंच, नसेल तर मिळवायचंच.