माझ्या लहानपणीच्या ज्या दिवाळीच्या आठवणी आहेत त्या मजेच्या, सुखदायक अशाच आहेत. आम्ही दिवाळीची किती वाट पाहात असू आणि दिवाळी संपली की किती उदास वाटत असे ते आठवतंय.
आता जाणवतं. सगळे सणवार बायकांना किती दमवणारे आहेत.
दिवाळी म्हंटलं की फराळाचे पदार्थ आठवतात. ते सगळे आई घरीच करी.
पुरूषांना तेल लावून द्यायचं बायकांनीच,
रांगोळ्या काढायच्या बायकांनीच,
चारीठाव पक्वांनासहीत स्वैपाक करायचा तोही बायकांनीच,
घराची सजावट, पणत्या लावणं करायचं ते बायकांनीच
नंतर नटायचं तेही बायकांनीच
यावेळेस जरा वेगळा विचार करू या.
कामांकडे एक संधी म्हणून पाहू या.
म्हणजे रांगोळी काढायला मजा येतेच ना?
कामांमुळे वेगवेगळ्या कलांची ओळख होते.
ताण कमी करायला याचा उपयोग होऊ शकतो.
बरीचशी तीच तीच निर्रथक कामे करायला लागल्याने बाईमधे एक चिवटपणा येत जातो.
रिकाम्या वेळेचं काय करू? याचा फार मोठा प्रश्न तिच्यासमोर उभा राहात नाही.
दागिने, कपडे, सजावटीच्या वस्तू यात मन घातल्याने, त्यापलीकडच्या मूलभूत प्रश्नांना त्या हात घालत नाहीत,
त्यामुळे तिथली तीव्र निराशा, एकाकीपण यांची त्यांना ओळखही होत नाही..
अज्ञानात सुख!
(पुरूषही फार पलीकडचा विचार करत असतील, असे नाही..)
बायकांसमोरची कामे, ही नियम पोटनियमासहीत समोर असतात.
"आपल्या घरी असं असतं."
त्यांनी विचार करावा, ही अपेक्षा नसते.
विचार करण्यामुळे जे झगडे करावे लागतात ते टळतात.
मध्यमवर्गीय बायका दुय्यम पण एक सुखाचं जीवन जगू शकतात.
ज्या तसं जगतात त्यांना तसं जगू द्यावं.
तुम्हांला शक्य झालं तर तुम्हीही बघा.
जर स्वातंत्र्य आणि स्वाभिमान यांच्याशिवाय जगणं शक्य नसेल तर
तुमचा मार्ग खडतर आहे.
शुभेच्छा!
आता जाणवतं. सगळे सणवार बायकांना किती दमवणारे आहेत.
ReplyDelete>> खरंय !!!
यावेळेस जरा वेगळा विचार करू या.
कामांकडे एक संधी म्हणून पाहू या.
म्हणजे रांगोळी काढायला मजा येतेच ना?
कामांमुळे वेगवेगळ्या कलांची ओळख होते.
ताण कमी करायला याचा उपयोग होऊ शकतो.
>> असेलही. पण बाईला रांगोळी न काढण्याचा ऑप्शन असायला हवा. एखादीला नसेल आवड/ इच्छा/ कला तर तिला "रांगोळी काढायचाच ताण येणं" वाईट आहे.
बरीचशी तीच तीच निर्रथक कामे करायला लागल्याने बाईमधे एक चिवटपणा येत जातो.
रिकाम्या वेळेचं काय करू? याचा फार मोठा प्रश्न तिच्यासमोर उभा राहात नाही.
>> पण जिच्याकडे रिकामा वेळच नाही तिने अजून अशी निरर्थक कामं करत राहावी ही अपेक्षा कश्यासाठी?
जर स्वातंत्र्य आणि स्वाभिमान यांच्याशिवाय जगणं शक्य नसेल तर
तुमचा मार्ग खडतर आहे.
>> खरंय !!!
Hmm... खडतर मार्गक्रमणासाठी शुभेच्छा!
ReplyDelete