Tuesday, June 12, 2012

वाचकांचे लेख -- आपली आपली एन्जॉयमेंट !!!


हा माझा ह्या ब्लॉग साठीचा पहिलाच लेख आहे... काही चुकलं तर समजून घ्या...

जास्त पाल्हाळ न लावता मुद्द्यावर येते.. माझं असं ऑ  ब्झर्वेशन आहे कि लहानपणापासून जसे स्त्रीच्या मनावर "पुरुषांशिवाय तू कोणीही नाही/ तुझ्या अस्तित्वाला काही अर्थ नाही" असे बिंबवले जाते त्याचप्रमाणे "पुरुषांशिवाय मजा/आनंद हा खरा आनंदच नाही" असेही ठसवले जाते... ह्याचाच परिणाम म्हणून पुरुष आपल्या  बायकांशिवायही मजेत पार्टी 
 वगैरे करताना दिसतात.. इकडे तिकडे ट्रीप ला जातांना दिसतात.. पण बायकांना मात्र नवऱ्याशिवाय कुठल्या मौजमजेची कल्पनाही करवत नाही..

बायको घरी नसेल तर खुशाल एकटे-दुकटे सुद्धा हॉटेल मध्ये येऊन जेवणारे अनेकजण आपण पहिले असतील.. पण आज कंटाळा आला म्हणून एकटीच बाई कधी कुठे येऊन जेवतेय असे दिसते का?? अगदी घरात एक दिवसापुरते तिच्यावर अवलंबून असणारे कोणीही नसले तरी..??

पुरुष स्वत:चे मजेमजेचे प्लान्स ठरवतांना बायकांना अगदी सहज गृहीत धरतात.. म्हणजे.. एखाद्या पुरुषाच्या मित्रांच्या ग्रुप मध्ये ट्रीप ला  वगैरे  कुठे जायचे ठरले तरी तो अगदी सहज होकार कळवून मोकळा होतो.. बायका मात्र "ह्यांना विचारून/ आईंना विचारून सांगते" अश्या छापाची उत्तरे देतात.. आणि नुसतीच उत्तरे देत नाहीत तर खरोखर परवानगी काढतात.. (आता हा भाग वेगळा कि बऱ्याच जणी "हे सोडत नाहीयेत.. किंवा सासूबाईंना नाही चालणार" याचा बहाणा म्हणून वापर करतात).. पण म्हणून तिला फक्त तिचा विचार करून चालत नाही हे खरे..

माझ्या सासुबाईंची नेहमी तक्रार असते कि त्यांना माझ्या सासरेबुवांनी कधीच कुठे फिरायला वगैरे नेले नाही.. त्यांची फिरण्याची आवड मारून टाकली इत्यादी.. म्हणून मी ठरवले कि आपण त्यांना सध्या प्रसिद्ध असलेल्या एका लेडीज ओन्ली ट्रीप (केसरीची माय फेअर लेडी)ला पाठवू.. तसं मी त्यांना बोलूनही दाखवले.. पण कसचं काय? त्यांना आपल्या नवऱ्याशिवाय कुठे जायचे किंवा कोणती मजा करायची हि कल्पनाच सहन झाली नाही.. त्यांनी मला तसं बोलूनही दाखवले...

एवढेच कश्याला? मला लहानपणापासून कधीच कुठल्या मुक्कामी ट्रीप ला वैगेरे कधी जाऊ दिले नाही घरातून.. कधी विचारले तर उत्तर मिळायचे.." आधी लग्न करा आणि मग नवरयाला घेऊन फिरा कुठे फिरायचे ते".. म्हणजे? मला स्वत:ला एक माणूस म्हणून कुठलीही मौज-मजा करण्याचा अधिकार नाही का?? अर्थात याला अपवाद असणारे पालक आणि सासरकडचे असतीलही जगात.. पण.. मेजोरीटी ह्या अश्या संस्कारांचीच दिसून येते...

अर्थात हेही मान्य आहे कि प्रत्येक वेळी घरच्यांचीच सक्ती असेल असे नाही.. कुठे एकटे जायला.. आपल्यालाच खुपदा  नवऱ्याशिवाय मजा करावीशी वाटत नाही.. पण.. मला वाटते ह्याची मुळे आपल्या इच्छेत कमी आणि आपल्यावरच्या संस्कारात जास्त दडलेली आहेत..

तुम्हाला काय वाटते???

- पियू

5 comments:

 1. वा! वाचकांतील लेखिकांचे स्वागत.

  ReplyDelete
  Replies
  1. स्वागतासाठी आभार. तुमचे या विषयावरचे विचार कळले तर खूप आनंद होईल.

   Delete
 2. This comment has been removed by the author.

  ReplyDelete
  Replies
  1. दीपाताई प्रतिसादाबद्दल आभार.. पण हा प्रतिसाद मला माझ्या दुसऱ्या लेखाला दिल्यासारखा वाटतो (जो अजून प्रसिद्ध झाला नाहीये आपल्या ब्लॉग वर, मीही वाट पाहतेय तो कधी प्रसिद्ध होईल याची :)). तरीही तुझं मत तंतोतंत पटलंय..

   आपला स्वत:चा आनंद ,आपल्याला मजा येण्याच्या गोष्टी या कोणाही माणसावर अवलंबून ठेवू नकोस. बघ ती व्यक्ती जर आपल्या बरोबर असेल तर नक्कीच मजा येते.पण नाही म्हणून ती गोष्ट करायचीच नाही हे चुकीचे आहे.आलात तर तुमच्या बरोबर नाहीतर त्याच्याशिवाय.....प्रत्येक क्षणाचा आनंद लुटता आला पाहीजे. तो कोणावर अवलंबून ठेवू नये.>>

   अगदी अगदी.. "आपला आनंद दुसऱ्यावर अवलंबून ठेवला तर आपला आनंद आपणच गमावला असं समजा.." असं नुकतंच "शिवराज गोर्ले" यांच्या "मजेत जगावं कसं" या पुस्तकात वाचायला मिळाल.. ते सगळ्यात नाते-संबंधांना लागू पडतं..

   Delete
 3. http://asvvad.blogspot.in/2012/06/blog-post_5152.html

  ReplyDelete

आतलं जग

श्रीदेवीला सारख्या कॉस्मेटीक सर्जर्‍या करून आपलं वय लपवावं असं वाटण्यामागे  काय असेल? असुरक्षितता, भीती, self accepatance  नाही, self lo...