मागासलेल्या आफ्रिकी जमातींमधे अशी समजूत आहे की जर मुलींची नीट लग्ने व्हायला हवी असतील तर त्यांची सुंता केलीच पाहिजे. मुलगी वयात येण्यापूर्वीच लग्न व्हायला हवे. सुंता न केलेल्या मुलीशी कोण लग्न करणार? विवाहाविना राहणारी स्त्री म्हणजे चेटकीण. तिला हालहाल करून, दगडांनी ठेचून वा जिवंत जाळून मारलं जायचं. स्त्री म्हणजे पापाचं आगार. तिच्या दोन मांड्यांमधे दडलेला योनिमार्ग म्हणजे नरकाचं प्रवेशद्वार, त्या दाराची योग्य साफसफाई, योग्य वयात केली तरच ती पापमुक्त होऊन विवाहास योग्य ठरते. मुलीची सुंता करण्याचं काम पुरूषांना ठाऊक असलं तरी ते त्यांच्या नजरेआड करणं आवश्यक असतं. ही साफसफाई अत्यंत गुप्त रितीने पार पाडण्यात येते.
या प्रथेला कुराणातून किंवा कुठल्याही धार्मिक ग्रंथातून अधिकृतता मिळालेली नाही. पण वर्षानुवर्षे ही प्रथा चालू आहे. वारीसने ही जगासमोर आणली.
भयंकर आहे!
भारतात ही प्रथा अस्तित्वात नाही म्हंटलं तरी चालेल, बोहरी मुस्लिम समाजात अल्प प्रमाणात मुलींची सुंता करतात.
पण हे नसलं तरी अमानुष प्रथांच्या बाबतीत भारत मागे नाही. कधीकाळी, थोडक्या समाजासाठी का असेना , सतीप्रथा अस्तित्वात होतीच ना! आपणही नवर्याच्या माघारी बाईचं जगणंच नाकारत होतो!
अश्विनी आणि दीपाने लिहिलंय ते खरंच आहे. पुरूष सुखी -- जग सुखी..... कसं नां? ..... मुलींना वाढवलं जातं तेच त्यांचं शरीर हे कुणा पुरूषासाठी आहे, हे बिंबवत. असं थेट कुणी सांगत नाही, पण तसंच असतं ते! मुलींचं दिसणं, तिचं शरीर, तिचं नटणं, तिचे कपडे, तिचं वावरणं हे कुणा एका पुरूषासाठी आहे, इतरांपासून तिने सावध राहायचं आहे.
आपण मुलींना हे कधी शिकवणार? तुझ्या आयुष्याची तू मालकीण आहेस. तू स्वत:साठी जग.
स्त्री जर स्वत:च्या शरीरसुखाचा विचार करायला लागली तर ती वेश्या. बायको ही केवळ मुले जन्माला घालण्यासाठीच! वेश्येला घर आणि गृहिणीला शृंगार नाकारलेलाच होता!
सगळ्या प्रकारच्या पुरूषांसाठी वेश्या कायमच उपलब्ध होत्या. समाजाचा हिस्सा होत्या.
बायका स्वत:च्या सुखाचा विचार करायला लागल्यावर पुरूषवेश्या अधिकृतपणे अस्तित्वात आले असावेत!
सैनिकांच्या सोयीसाठी वेश्या पुरवल्या जाण्याचे पुरावे इतिहासातही दिसतात पण त्यांच्या घरी राहिलेल्या बायकांनी काय करायचे? तर चॅस्टीटी बेल्ट!
********
No comments:
Post a Comment