विद्या तुझा सौंदर्य या विषयावरचा ब्लॉग वाचला आणि तेव्हाच माझ्या लहानपणापासूनच्या काही आठवणी मनात येऊन गेल्या.लहान नू.म.वि. शाळेत असताना आमचं स्नेहसंमेलन आलं की तेव्हा मला त्याच्यात आनंद घेण्यापेक्षा मनातून खूप वाईट वाटत असे याची मुख्य कारणे म्हणजे माझी उंची,ज्यामुळे नाचात कायमच मी मागच्या रांगेत ,दुसरं म्हणजे रंग...... समाजाच्या दृष्टीने गो-या गोमट्या, देखण्या यात बसणा-या मुली स्टेजवर पुढे असत. त्यामाने कमी देखण्या मागच्या रांगेत असा जणू नियमच ठरलेला.समाजात अजूनही दीसणं हा कीती महत्वाचा मुद्दा आहे.तेव्हा त्या शाळेच्या वयात या बद्दल मनात एक प्रकारचा न्यूनगंड आला होता.त्यातून स्वत:च शहाणपण यायला बरीच वर्षे गेली.मी कॉलेजला असताना जेव्हा फोटोग्राफी विषय घेतला तेव्हा काळा रंगातील सौंदर्य म्हणजे काय?अनेक काळ्या रंगाच्या असणा-या व्यक्तींचे उत्कृष्ठ फोटो मी जेव्हा पाहीले तसतसा मनातला न्यूनगंड कमी झाला.माझं लग्न करण्याचा जेव्हा आई बाबा विचार करत होते तेव्हा आलेल्या अनेक स्थळांपैकी बहुतेक मुलांच्याकडून आलेल्या फोनवरचे संवादावरुन रंगावरुन नकार हे कारण होते.माणूस एवढा आपल्या बाह्यरुपाला महत्व देतो.याउलट इकडं कौस्तुभकडे सगळे पांढरे फटक गोरे असताना जिथून मला खात्रीने नकार येईल अशी अपेक्षा होती तिथूनच होकार आलेला पाहून मला धक्काच बसला. कारण त्याआधी आलेल्या स्थळांमध्ये आपलं दीसणं कीती महत्वाचे आहे हे अनुभवायला येत होतं.त्याबद्दल कौस्तुभचे खरंच कौतुक.आता आई म्हणून मी जेव्हा स्मृतीला वाढवतं असताना आमच्याकडे इतर माझ्या पुतण्या रंगाने गो-या आहेत त्यामुळे कधीकधी तिच्याकडूनही काळ्या रंगाबद्दलची नाराजी दीसते तेव्हा या रंगापलिकडे काही गोष्टी चांगल्या आहेत.आपलं वागणं,आपल्यातले गुण,आपल्या जवळची हुशारी ,आपल्या आवडी-निवडी अश्या अनेक विषयावर तिच्याशी बोलल्यावर तिचा चेहरा एकदम खुलतो.खरंच लहानपणापासून या गोष्टी आपण कश्या दाखवतो हे फार महत्वाचे वाटते.गोरं म्हणजे सुंदर आणि तसं आपन नसू तर अनेक गोष्टींच्या लेपनाने तो तात्पुरता गोरा रंग मिळवून समाजात मिरवणा-या बायकांकडे बघून खरंच कीव करावीशी वाटते अनेक प्रकारची महागडी सौंदर्य प्रसाधने वापरुन आपण आहोत त्यापेक्षा अधिक सुंदर दाखवणे. त्यासाठी पैसा, वेळ, आपली बुद्धी खर्च करणे म्हणजे केवळ मुर्खपणा आहे.आपल्या मुलींकडे पाहीले की खरंच बरं वाटत की घराच्या बाहेर पडताना त्यांना पावडर न लावताही बाहेर पडता येतं. स्वत:च्या दिसण्यात त्या एवढ्या गुरफटल्या जात नाहीत.आपलं बोलणं,आपलं हासणं, आपल्यातील छंद,कल्पकता यासारख्या अश्या अनेक गोष्टी म्हणजे खरं सौंदर्य......... याचा अर्थ त्यांना खूप लहान वयात माहीती होतोय.
सुखदुःखांचे,हळवे,कातर,हसरे,दुखरे,क्षण जपलेले. श्रावणातले जलबिंदू हे तया छेदिती प्रकाशकिरणे. प्रकाशकिरणांचे अंतर्मन नभी उमटवी इंद्रधनु. त्या रंगांचा गोफ साजिरा या गं सयांनो मिळुनि विणू.
Subscribe to:
Post Comments (Atom)
हिरो
माझ्या मैत्रिणीची एक मैत्रीण आहे. क्लार्क. आपलं काम प्रामाणिकपणे करणारी. कधीही कुठल्या कामाचे वरून किंवा टेबलाखालून असे पैसे तिने घेतले ना...
-
माझ्या मैत्रिणीची एक मैत्रीण आहे. क्लार्क. आपलं काम प्रामाणिकपणे करणारी. कधीही कुठल्या कामाचे वरून किंवा टेबलाखालून असे पैसे तिने घेतले ना...
-
मूळात कोणतीही दोन माणसे.... त्यांचे विचार वेगळे,जगण्याची उद्दीष्टे वेगळी,पद्धती वेगळ्या,आवडी-निवडी वेगळ्या.हे आपण जर समजावून घेत असू तर आपली...
-
यात्रा हे मुक्ता बाम लिखित दिग्दर्शित नाटक आहे. एकपात्री आहे, सुकन्या गुरव ने आक्काच्या भूमिकेचं सोनं केलं आहे. यात्रा ही आक्काची गोष्ट आह...
बरोबर आहे.. आपण गोष्ट सांगतांना "एक खूप सुंदर परी/ राजकन्या होती. सुंदर म्हणजे कशी? तर गोरी गोरी पान.. फुलासारखी नाजूक, लांबसडक केस, गुलाबी गाल" असे वर्णन न करता " सुंदर म्हणजे कशी? तर मनाने सुंदर.. सगळ्यांना मदत करणारी, सगळ्यांशी हसून खेळून वागणारी" असे वर्णन केले तर आपल्या मुलांच्या मनावरचा बाह्यरुपाचा पगडा काढू शकतो शिवाय त्यांना चांगल्या वागणुकीचे धडेही त्यांच्या नकळत देऊ शकतो.
ReplyDelete