वैवाहिक (सह)जीवन यशस्वी होणं, हे वय लहान-मोठं असण्यावर अवलंबून नसावं. ती सोय आहे, ते नातं आयुष्यभरासाठीचं आहे त्यामुळे दोघांनी मरेपर्यन्त एकमेकांना साथ देण्याची शक्यता वाढते इतकंच. कुठल्याही नातेसंबंधांचा आलेख हा दोघांच्या मॅच्युरीटीवर अवलंबून असतो.खरं आहे. समज कितीही असो पण दोघांची समजेची पातळी सारखी असेल तर बरं पडतं. समज ही अशी गोष्ट आहे की वय वाढलं म्हणून वाढेलच असं नाही. दुसर्याला कायम समजून घेत राहणं ही सोपी गोष्ट नाही. समज सारखी असल्याने परस्पर सुसंवाद शक्य होऊ शकतो.
मला तरी मी बोललेलं समोरच्याला कळणं / निदान कळणं गरजेचं वाटतं. विचार वगैरे जुळणं पुढच्या गोष्टी. माझ्या आणि मिलिन्दच्या बाबतीत आम्ही बोललेलं एकमेकांना (विचारांच्या पातळीवर) कळू शकतं ही गोष्ट मला फार समाधानाची वाटते. आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे सगळ्या मर्यांदांसह एकमेकांचा स्वीकार! मिलिन्दला ही गोष्ट सहज जमली. मी मात्र कितीक वर्षे त्याच्यात छोटे मोठे बदल व्हावेत यासाठी प्रयत्न करत राहिले. त्याच्यात काही बदल झाले नाहीत, मी त्या गोष्टी स्वीकारण्याची माझी पात्रता वाढवण्यासाठी ही वर्षे खर्ची घातली. मिलिन्दला सुरूवातीपासूनच माझ्यात काहीही बदल अपेक्षीत नव्हते. याचा अर्थ माझ्यात उणीवा नाहीत किंवा नव्हत्या असं नाही तर त्यांच्यासह स्वीकार असं होतं. आपण एखादं माणूस कसं असेल याचा अदांज करतो, त्याने तसंच असावं असा आग्रह धरतो, पण ते माणूस काही तुमच्या कल्पनेतलं नाही, प्रत्यक्षात आहे. काही बाबतीत हे प्रत्यक्षातलं माणूस कल्पनेतल्या माणसापेक्षा कितीतरी छान असतं. हा साक्षात्कार व्हायला माझी किती वर्षे गेली. बरेचदा मी धडपडत, ठेचकाळत जे शिकते, ते मिलिन्दने सहजपणे आधीच आत्मसात केलेलं असतं. पण माझा लांबचा प्रवास झाल्याने माझ्या खात्यावर अधिक शहाणपण जमा होतं, एव्हढं खरं.
नवरा-बायकोचं नातंच असं आहे ना? रोजचा सारखा संबंध येणारं, इतक्या जवळून सारखं पाहिल्याने त्या माणसाचं तटस्थपणे काही मूल्यमापन करणं अशक्य होतं. मी तर म्ह्णते नवरा बायको एकमेकांबद्दलचा किमान आदर शिल्लक ठेवू शकले तरी खूप आहे.
या नात्यात समानता राखणे ही कसरतीची गोष्ट आहे. बरेच संसार हे कोणाच्या तरी/ दोघांपैकी एकाच्या शोषणावर उभे असतात. संसार या चौकटीचीच ही गरज आहे की काय वाटण्याइतके हे सार्वत्रिक आहे.
एकमेकांसाठी वेळ काढणे आणि बोलत राहणे याही खूप महत्वाच्या गोष्टी आहेत. आमच्या घरात माझ्या बाजूने मी हे करत आले. मिलिन्दला याची तितकीशी गरज वाटली नाही किंवा या बाबतीतल्या आमच्या गरजांच्या पातळ्या वेगळ्या आहेत.
नवरा-बायकोच्या नात्याचं बंधन किंवा ओझं होऊ नये. त्यासाठी दोघांनीही सगळ्या बाजूंनी फुलतं राहणं गरजेचं आहे.