मी बाई आहे याचा मला आनंदच होतो.
बाईचं आयुष्य अधिक समृद्ध असतं पुरूषाच्या आयुष्यापेक्षा. नैसर्गीकदृष्ट्याही आणि सामाजिकदृष्ट्याही. अधिक सुखाचं असतं असं नाही म्हणत आहे मी, पण समृद्ध नक्कीच असतं.
बाई ही कायमच कमी दर्जाची समजली गेली आहे. माणसाच्या इतिहासात (HIS-STORY) बाईच्या कामाची कुठे नोंदच केली गेलेली नाही. बायकांनी लावलेला टोपलीचा शोध असो की शेतीचा शोध असो, पुसले गेले. व्यवस्थाच अशी बनवली गेली की फक्त घराबाहेरच्या कामांची नोंद होते. बायकांना वर्षानुवर्ष घरकामालाच जुंपलं गेलं आहे. त्यांना संधीही सहज मिळत नाही. आजचं हे जग मुख्यत्वे पुरूषाच्या कर्तृत्वावर उभं आहे. बायका सहकारी असतील पण नेतृत्व पुरूषांच आहे.
मला बरं वाटतं मी पुरूष नाही ते. या जगाचं जे वाट्टोळं केलं आहे, तेही पुरूषांनीच ना? बहुसंख्य दहशतवादी पुरूष आहेत, बहुसंख्य सैनिक पुरूष आहेत, बहुसंख्य राजकारणी पुरूष आहेत. बलात्कार करणारे तर पुरूषच असतात फक्त.
मला बाई असण्याचं समाधान वाटतं. त्यात अश्विनी म्हणते तसं निर्मितीची क्षमता हे एक आहे, पण तेच एक नाही.( त्याआधारे बायकांची केली जाणारी वर्गवारी मला मान्य नाही.) समजून घेण्याची क्षमता वगैरे मिलिन्द म्हणतो तसं सामाजिक घडणीने लादलेल्या गोष्टी आहेत. मग माझं बाईपण कशात आहे?केवळ शारिरिक फरकात? हो, आदर्श समाजव्यवस्थेत ते तेव्हढ्यातच असेल.पण आजच्या समाजव्यवस्थेत मला ते सारखं लक्षात ठेवावं लागतं.
मला केवळ एक चांगलं माणूस म्हणून जगायचं आहे. आपण समाजात समानतेचं वातावरण आणू शकलो तर तुम्ही बाई असा की पुरूष असा तसा फरक पडणार नाही.
बाई असण्याचे तोटे हे आहेत, प्रतिष्ठा आणि आत्मसन्मान तुम्हांला सहजी मिळत नाही, कमवावा लागतो. तुम्हांला कायम आवरून सावरून राहावं लागतं, पावित्र्य जपणे, पुरूषांपासून सांभाळून राहणे या आणखी काही गोष्टी. दुय्यमत्व स्वीकारावे लागते.
बाई असण्याचे फायदे असे आहेत की, कमावण्याचं, कर्ते असण्याचं दडपण नसतं. अपेक्षांचं दडपण कमी असतं. यादी वाढवता येईल पण ही सगळी कारणे आपल्या आजच्या समाजव्यवस्थेमुळे आहेत.
स्मिताने लिहीलं आहे तसं प्रत्येकात काही खास स्त्रीचे मानले गेलेले गुण असतात तर काही खास पुरूषाचे मानले गेलेले गुण असतात. (मानले गेलेले यासाठी की तसं च घडवलं जातं.) पण समाजात स्त्रीचे तथाकथित पुरूषी गुण आणि पुरूषाचे तथाकथित स्त्रीत्व प्रगट करणारे गुण जाहीरपणे स्वीकारले जात नाहीत.
मी तेच तर म्हणते आहे, मला माझ्या गुणावगुणांसह मोकळेपणाने एक माणूस म्हणून जगायचं आहे.
मी एक बाई आहे, मी वेगळी आहे पुरूषांपेक्षा, माझं कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी म्हणून मला पुरूष व्हायचं नाहीये.
तथाकथित पुरूषांचं मानलं गेलेलं क्षेत्र निवडायचं, तिथे त्यांच्या नियमांनी खेळून आपला ठसा उमटवून स्वत:ला सिद्ध करायचं. हा मार्ग जुना झाला. जिथे तिथे ’प्रमाण’ पुरूष आहे. हे जगच बदलायला हवं. जरा आमच्या डोळ्यांनी बघायला जगाने शिकायला हवं.
अश्विनीने लिहिलंय तसं ’नको हे बाईपण’ असं वाटणारे प्रसंग माझ्यावरही आले नाहीत. नको ते पुरूष असं म्हणायला लागावं असे पुरूषही माझ्या वाट्याला आले नाहीत.
खरं म्हणजे माझ्या जवळच्या वर्तूळातले पुरूष फारच चांगले आहेत. माझ्याशी तरी चांगलेच वागलेले आहेत. बाबा माझ्याशी समानतेने वागले. मिलिन्दच्या डोक्यात समानतेचा तराजू पक्का आहे. तो माझ्याशीच समानतेने वागतो असे नाही तर त्याच्या बहीणींशी, इतर नात्यातल्या, ऑफीसमधल्या स्त्रीयांशी पण समानतेने वागतो, हे मला महत्त्वाचे वाटते.( माझ्याही समोर कोणी अन्यायी पुरूष नाही, ज्याला मी जबाबदार धरू.) माझा राग व्यवस्थेवरच आहे.
बाईपण श्रेष्ठ की पुरूषपण? हे ठरवता येणं अवघड आहे. पण निकाल देणं अनिवार्य असेल तर मी तो बाईच्या बाजूने लावेल.
मिलिन्दला हाच प्रश्न विचारला तर तो म्हणाला निर्विवादपणे स्त्री. कारण विचारल्यावर म्हणाला,” बायकांची स्वत:ला विसरून दुसर्याच्या भुमिकेतून विचार करण्याची क्षमता आणि निरनिराळ्या रूपांमधे वेगवेगळ्या नावांनी (वात्सल्य, ....) अमर्याद प्रेम करण्याची शक्ती.

No comments:
Post a Comment