दीपा,
खूप खरं लिहीलं आहेस. हे सोपं नसतं.
पण यात नवीन काही नाही. हे असं चालत आलेलं आहे. इतकं सवयीचं आहे, बर्याच जणींना/जणांना ते नैसर्गीक वाटतं.
स्त्री परावलंबी असणे हे पुरूषसत्ताक व्यवस्थेसाठी गरजेचं आहे.
तुझं काय म्हणणं आहे? परावलंबन नको? नक्की?
हे नीट विचार करून ठरवायला हवं आहे.
परावलंबन ही खूप मोहविणारी गोष्ट आहे. ’आपण विचारच करायचा नाही’ ही तर चैन आहे. आपल्या वतीने कोणीतरी विचार करेल, आपण केंव्हा काय करायचं हे ठरवेल, आपण नुसतं तसं वागायचं. किती छान!
हे नकॊ असेल तर विचार करायला हवा. आपल्या निर्णयाची आणि आपल्या आयुष्याचीही जबाबदारी घ्यायला हवी. चुकलात तर कोणाकडे बोट दाखवून सुटका करून घेता येणार नाही. आणि मग चुकत माकत जगायलाही मजा येईल.
आहे ही चौकटही बर्यापैकी वाकवून घेता येते. तसे प्रयत्न आपण करतो का?
स्त्री ही नकोशी आहेच, फक्त ती समाजधारणांना अनुकूल अशी वागत असेल तर तिला चालवून घेतात.
त्याचं काय आहे दीपा? देवाने आधी पुरूष निर्माण केला , नंतर त्याला एक खेळणं हवं, त्याच्या सेवेसाठी आणि मनोरंजनासाठी कुणीतरी हवं ना? म्हणून स्त्री निर्माण केली. ही गोष्ट तुला माहीत आहे ना? पुढेही मुक्तीच्या मार्गातली धोंड वगैरे.....
’माझ्या शरीरावर माझा हक्क’ असं सांगत स्त्रीवादी चळवळ पुढे आली. तुमच्या शरीरावर तुमचा अधिकार आहे, ती काही कुणाची इस्टेट नाही. तुम्ही स्वत:च्या शरीराचा आदर करा आणि इतरांना करायला लावा. स्वत:च्या हक्कांविषयी जागरूक राहा. ही लढाई जिची तिला लढायची आहे, स्त्रियांनाही शारीरिक सुखाचा अधिकार आहे हे सांगणारी एक विचारधारा तुमच्या पाठीशी आहे इतकंच! (इथे फ्रॉइडदेखील स्त्रियांच्या विरोधात आहे, त्याचं म्हणणं त्यापुढच्या शास्त्रज्ञानी खोडून काढलं)
(तुझ्या लेखात न आलेल्या संशय/ पावित्र्य या गोष्टीसाठीही बायकांना खूप सोसावं लागतं. अगदी सीता अहिल्येपासून ते आजतागायत, जगभरच! Chastity belt चा इतिहास असो की तस्लिमा नसरीनची लज्जा असो.)
तू उलट विचार करून पाहिला आहेस का? पुरूष किती परावलंबी असतात याचा??
ते, त्यांचे ते स्वत:, काहीही करू शकत नाहीत. त्यांना वाढवलयंच तसं! बिच्चारे.
०००००००००००००००००००००००००
बायकांनी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी असावं असं मला कायमच वाटत आलेलं आहे.
आता तरी आम्ही दोघांनी मिळून काही प्राधान्यक्रम ठरवले आहेत, काही व्यवस्था ठरवलेली आहे, पण लग्न झालं तेंव्हा लग्न केलं म्हणून मिलिन्दने मला का पोसायचं असं मला वाटत असे. देण्याघेण्याचा व्यवहार ’साजरा’ व्हायचा असेल तर घेणार्यापेक्षा देणार्याला ती काळजी घ्यावी लागते.आर्थिकबाबतीत मिलिन्दने हे खूप सहजपणे केलं. (नाहीतर मी तेंव्हा कायम दुखवून घ्यायला तयार अशीच असे.)
तरीही काही गोष्टी माझ्यात भिनलेल्य़ा आहेत. मिलिन्दसाठी, मुलांसाठी किंवा घरासाठी काही खर्च करायचा असेल तर मी एकदा विचार करते, पण माझ्या एकटीसाठी काही घ्यायचे असेल तर मी चारदा विचार करते, नक्की हे आवश्यक आहे ना?(खरं म्हणजे ती रक्कम फारशी मोठी नसते.)
आत्ताच्या टप्प्यावर आमच्या घरातली कामाची विभागणी ही पारंपारिकच आहे. त्यानुसार स्वैपाक करणे हे माझेच काम आहे.
आम्ही वेगवेगळ्या कारणांसाठी बाहेर जेवायला जातो. कधी ठरवून, कधी मुलांना हवं असतं म्हणून, कधी कोणालातरी घेऊन, कधी मिलिन्द्ने काहीतरी वाचलेलं असतं, तिथला खास पदार्थ खाण्यासाठी. पण कधी मला स्वैपाक करायचा कंटाळा येतो म्हणून आम्ही बाहेर जातो. अशावेळी मला वाटतं पार्सलच आणलं तर? किंवा नुसती पावभाजीच खाल्ली तर, चालेल की! बाहेरच जायचं ठरलं तर मला वाटतं अगदी ’ऑफ बीट’ वगैरे नको. सूप पासून सुरूवात आणि आईसक्रीमपर्यन्त नको. अशावेळी मी आवर्जून बील पाहते, ती रक्कम म्हणजे मला माझ्या कामचुकारपणाची किंमत आहे असं वाटतं. म्हणून मी कंटाळा करायचं थांबवते असं नाही पण चुकचुकत राहणंही थांबवू शकत नाही.
००००००००००००००००००००००००००००००००००

दोघांमधील understanding हे कुटुंबाचा भक्कम पाया आहे. तू सर्व बाजूने शांतपणे विचार करायला लावल आहेस. कोणत्याही गोष्टीकडे बघण्याच्या द्रुष्टीकोनावर स्वास्थ अवलंबून असतं.
ReplyDelete" कामचुकारपणाची किंमत आहे असं वाटतं. म्हणून मी कंटाळा करायचं थांबवते असं नाही पण चुकचुकत राहणंही थांबवू शकत नाही." हो हे असं वाटू शकत, पण जेव्हा असं दोन्ही बाजूने बघतो तेव्हाच शांतपणा येतॊ.
ती रक्कम म्हणजे मला माझ्या कामचुकारपणाची किंमत आहे असं वाटतं. म्हणून मी कंटाळा करायचं थांबवते असं नाही पण चुकचुकत राहणंही थांबवू शकत नाही. >>
ReplyDeleteमग यावर घरात तू आणि नवर्याने एक दिवसा आड स्वयंपाक करणे हा उपाय होऊ शकतो का?? म्हणजे इतका कंटाळा येणार नाही.. शिवाय स्वयंपाक हे फक्त तुझे काम आहे (कारण तू बाई आहेस) हा घरात रुजत जाणारा संस्कारही (तुझ्याही नकळत अंशत: तरी नक्की रुजत असेल.. मुलांच्या नजरेतून एकही गोष्ट सुटत नाही) तू पुसून टाकू शकशील..
>>मग यावर घरात तू आणि नवर्याने एक दिवसा आड स्वयंपाक करणे हा उपाय होऊ शकतो का??
ReplyDeleteउपाय इतके सोपे असते तर काय हवं होतं? :)
नाही कळलं.. (म्हणजे हा उपाय का उपयोगात येऊ शकत नाही ते)..
ReplyDelete