पंचवीसेक वर्षांपूर्वीचं असेल. तालुक्याच्या गावातील एक डॉक्टर जोडपे. स्कूटरवरून जवळच्या खेड्यात जात होते. स्कूटर बंद पडली. खटपट करूनही सुरू होत नव्हती. थोड्या वेळाने एक ट्रक येत होता, तो थांबवला आणि सोडण्याची विनंती केली. दोघे ट्रकमधे बसले. पुढे गेल्यावर निर्जन ठिकाणी ट्रक थांबवून ट्रकमधल्या दोघातिघांनी त्या बाईवर बलात्कार केला. नवर्याला एकाने धरून ठेवलं.....
दोघेही किती अपमानित झाले असतील. एकमेकांकडे पाहावंसही वाटलं नसेल. नंतरचे काही दिवस किती अवघड असतील..
सगळ्यांना कळलं असेल असं नाही पण काहीजणांना निश्चितच कळलं. त्या डॉक्टर नवर्याने काय काय विचार केला, आणि बलात्कार झालेल्या आपल्या बायकोला घटस्फोट द्यायचं ठरवलं. ती साधी नव्हती. तिने घटस्फोट द्यायला नकार दिला. ती नवर्याला म्हणाली, " मी काय स्वत:च्या मर्जीने गेले का? तुम्ही समोर होता ना? आता घटस्फोट द्यायला निघाला आहात तेव्हा का नाही बायकोला वाचवलंत?"
हटून राहीली .... नाही दिला घटस्फॊट तिने .... तिच्याकडे मुद्दे होते....
दोन माणसांतलं नातं काय असं मुद्द्यांवर असतं का? ते ही लग्नाचं नातं?
बलात्कार झाला, नवरा असहाय.. काही करू शकला नाही. हे तिने पचवलं असेलही पण नंतर घटस्फॊट देऊ इच्छिणार्या नवर्याला त्या बाईनं कसं समजून घ्यायचं?
पवित्र अपवित्रतेच्या समाजातील कल्पनांचा खोलवर पगडा, स्वत:च्या असहायतेनंतर, अपमाना्नंतर, स्वत:ची तथाकथित प्रतिष्ठा सांभाळण्याचा केविलवाणा प्रयत्न असंच काही असणार घटस्फोट घेण्याच्या इच्छेमागे.
शिवाय पुरूषत्वाच्या / पौरूषाच्या चुकीच्या कल्पना.
******
या गोष्टीत ती ठामपणे उभी राहिली म्हणून नंतर संसार झालाही असेल नीट, चारचौघांसारखा...
पण अशा तूटून गेलेल्या नवर्याबरोबर संसार करत राहणे हीसुद्धा शिक्षाच नाही का?
तिने काय विचार केला असेल? सोडण्यापेक्षा राहणं सुसह्य होईल?
******
बलात्कारीत स्त्री समोर काय पर्याय असतात, पुढील आयुष्य जगण्याचे?
समाज काय ठेवतो पुढ्यात?
आयुष्याची सरळ रेष का विस्कळीत होऊन जावी?
आधीच ती मना शरीराने खोलवर दुखावलेली असताना, तिच्या जवळच्यांना तिच्या विरोधात उभे करणारे कसले हे समाजाचे नियम?
कसल्या या पावित्र्याच्या कल्पना?
आपण कधीतरी या तपासणार आहोत का?
congratulations !!!!
ReplyDeleteCongrats
ReplyDeletehttp://abpmajha.newsbullet.in/videos/maharashtra/25238-2013-02-03-10-38-00
हे उदाहरण अगदी नेमकं आहे. त्यात पुरुषी मानसिकता दिसतेच आहे, पण स्त्रीची मानसिकता देखील दिसते आहे.
ReplyDeleteती बाई ठाम राहिली ते तत्वासाठीच असेल ना, असं एकदा वाटून गेलं. कारण बुरसट पुरुषी मानसिकतेतून नवऱ्याने घटस्फोट द्यायचं ठरवलं, पण समाजातील याच मानसिकतेची दुसरी बाजू "स्त्रीने काहीही करून संसार टिकवायचा" ही देखील आहे. ती तत्वासाठी लढली असंच असू दे.
>> पण अशा तूटून गेलेल्या नवर्याबरोबर संसार करत राहणे हीसुद्धा शिक्षाच नाही का?
तत्वासाठी ती ठाम राहिली असेल, तर तिची भूमिका मान्य झाल्यावर, "अशा नवऱ्याबरोबर रहायचं नाही" म्हणून तिनेच घटस्फोट द्यायला हवा होता. (अर्थात हा नुसता उद्वेग. प्रत्यक्षातला निर्णय अर्थात त्या त्या व्यक्तीचा, त्या त्या परिस्थितीवर अवलंबून असणार)
ती डॉक्टर होती, कदाचित यामुळे तिला बळ मिळालं असेल का? माहीत नाही.
Delete"स्त्रीने काहीही करून संसार टिकवायचा" यासाठी नक्कीच ठाम राहीलेली नसेल.
हे केव्हा येतं? सासरघरचे किंवा नवरा कसाही असला तरी चालून घ्यायचा... असं असतं तेव्हा.
त्यातल्या त्यात चांगला पर्याय म्हणून तिने हा निवडला असेल. मुलांचा विचार केला असेल.
कोण जाणे..... किंवा सूड.... काहीही असेल.
>> "अशा नवऱ्याबरोबर रहायचं नाही" म्हणून तिनेच घटस्फोट द्यायला हवा होता.
अशा नवर्याबरोबर राहायचं नाही? तर हवा तसा नवरा कुठे मिळेल?
कदाचित आजवर चांगला असलेला नवरा या घटनेने फिरला, हे तिने पाहिले असेल.
कुठल्याही नवर्याचा काय भरवसा?
माझ्या माहितीत एक सेम केस आहे. फक्त सकाळी ते दोघे घरी आल्यावर ती बाई न्हाणीघरात शिरली आणि तिने स्वत:ला जाळून घेतले. :(
ReplyDelete>>बलात्कारीत स्त्री समोर काय पर्याय असतात, पुढील आयुष्य जगण्याचे?
Deleteसमाज काय ठेवतो पुढ्यात?
वाचून वाईट वाटतंय!
योनिशुचितेची कल्पना जर असे बळी मागत असेल. तर मोडीत काढली पाहीजे.
"योनिशुचीतेचा जाच फक्त स्त्रीलाच का?" हाही प्रश्न राहून राहून छळतो.
Deleteतू मागे योनिशुचीतेच्या आणि लैंगिकतेच्या / पातिव्रत्याच्या राजकारणाविषयी लिहिणार होतीस. मी अजूनही तुझ्या लेखाची वाट पहाते आहे. तुझा ह्या विषयावर काही अभ्यास असेल तर आमच्याशी नक्की शेअर कर.
एका बाजूला योनिशुचिता आहे तशी लिंगशुचिता आहेच.
Deleteपण बाईवर बलात्कार होऊ शकतो,
संस्कृतीचं बहुतांश ओझं बाईवरंच तर आहे.