Thursday, May 31, 2012

मला असा नवरा हवा

उतनी दूर मत ब्याहना बाबा !

निर्मला पुतुल

बाबा!
मुझे उतनी दूर मत ब्याहना
जहाँ मुझसे मिलने जाने ख़ातिर
घर की बकरियाँ बेचनी पड़े तुम्हे

मत ब्याहना उस देश में
जहाँ आदमी से ज़्यादा
ईश्वर बसते हों

जंगल नदी पहाड़ नहीं हों जहाँ
वहाँ मत कर आना मेरा लगन

वहाँ तो कतई नही
जहाँ की सड़कों पर
मान से भी ज़्यादा तेज़ दौड़ती हों मोटर-गाडियाँ
ऊँचे-ऊँचे मकान
और दुकानें हों बड़ी-बड़ी


उस घर से मत जोड़ना मेरा रिश्ता
जिस घर में बड़ा-सा खुला आँगन न हो
मुर्गे की बाँग पर जहाँ होती ना हो सुबह
और शाम पिछवाडे से जहाँ
पहाडी पर डूबता सूरज ना दिखे ।

मत चुनना ऐसा वर
जो पोचाई और हंडिया में
डूबा रहता हो अक्सर

काहिल निकम्मा हो
माहिर हो मेले से लड़कियाँ उड़ा ले जाने में
ऐसा वर मत चुनना मेरी ख़ातिर

कोई थारी लोटा तो नहीं
कि बाद में जब चाहूँगी बदल लूँगी
अच्छा-ख़राब होने पर

जो बात-बात में
बात करे लाठी-डंडे की
निकाले तीर-धनुष कुल्हाडी
जब चाहे चला जाए बंगाल, आसाम, कश्मीर
ऐसा वर नहीं चाहिए मुझे
और उसके हाथ में मत देना मेरा हाथ
जिसके हाथों ने कभी कोई पेड़ नहीं लगाया
फसलें नहीं उगाई जिन हाथों ने
जिन हाथों ने नहीं दिया कभी किसी का साथ
किसी का बोझ नही उठाया

और तो और
जो हाथ लिखना नहीं जानता हो "ह" से हाथ
उसके हाथ में मत देना कभी मेरा हाथ

ब्याहना तो वहाँ ब्याहना
जहाँ सुबह जाकर
शाम को लौट सको पैदल

मैं कभी दुःख में रोऊँ इस घाट
तो उस घाट नदी में स्नान करते तुम
सुनकर आ सको मेरा करुण विलाप.....

महुआ का लट और
खजूर का गुड़ बनाकर भेज सकूँ सन्देश
तुम्हारी ख़ातिर
उधर से आते-जाते किसी के हाथ
भेज सकूँ कद्दू-कोहडा, खेखसा, बरबट्टी,
समय-समय पर गोगो के लिए भी

मेला हाट जाते-जाते
मिल सके कोई अपना जो
बता सके घर-गाँव का हाल-चाल
चितकबरी गैया के ब्याने की ख़बर
दे सके जो कोई उधर से गुजरते
ऐसी जगह में ब्याहना मुझे

उस देश ब्याहना
जहाँ ईश्वर कम आदमी ज़्यादा रहते हों
बकरी और शेर
एक घाट पर पानी पीते हों जहाँ
वहीं ब्याहना मुझे !

उसी के संग ब्याहना जो
कबूतर के जोड़ और पंडुक पक्षी की तरह
रहे हरदम साथ
घर-बाहर खेतों में काम करने से लेकर
रात सुख-दुःख बाँटने तक

चुनना वर ऐसा
जो बजाता हों बाँसुरी सुरीली
और ढोल-मांदर बजाने में हो पारंगत

बसंत के दिनों में ला सके जो रोज़
मेरे जूड़े की ख़ातिर पलाश के फूल

जिससे खाया नहीं जाए
मेरे भूखे रहने पर
उसी से ब्याहना मुझे ।
++++


कविता छानच आहे.
मला वाटलं जुनी झाली, आजची कविता काहीशी अशी असेल/ असायला हवी.


बाबा,
माझ्या लग्नाची काळजी नका करू ,
मीच शोधीन मला साजेसा जोडीदार,
विश्वास ठेवा माझ्यावर,

मी शोधेन असा नवरा
जो माणसांशी माणसांसारखा वागेल,
प्राण्यांवर, झाडांवर माया करेल

रस्ते, इमारती, दुकाने आणि मोटारी
ही चुकली आहेत का कोणाला?
पण त्याला कधीतरी माझ्याबरोबर
मावळतीचा सूर्य आणि मध्यरात्रीचा चंद्र पाहावासा वाटेल
मोगर्‍याच्या सुगंधाने वेडं होता येईल...

मी असा नवरा शोधेन बाबा,
कविता ऎकायला गेलो ना
की त्याला योग्य ठिकाणी ’वा’ म्हणता येईल
केंव्हा निशब्दता अर्थपूर्ण असते, कळेल त्याला

कळेल त्याला गाण्यातलं माधुर्य 
चित्रातलं सौंदर्य आणि शब्दांचं सामर्थ्य
अशा मैफिलीत जो विसरून जाईल स्वत:ला

विसरून जाईला स्वत:ला मनाजोगं काम करताना
मुलांशी खेळताना, पुस्तकं वाचताना
सगळ्यांमधे असूनही एकटेपणाची जाणीव असेल त्याला

जाणीव असेल त्याला समाजातील नाहीरेंची
स्वत:तल्या, इतरांमधल्या कमतरतांची
माणसांच्या, समाजाच्या मर्यादा तो समजून घेईल

समजून घेईल मला
न सांगता कळत जाईल त्याला मी आतून आतून
तोही मला ओळखता येईल, आतून बाहेरून

मला ना, असा नवरा हवा बाबा!
जो कुठेच नाही आहे, माहीत आहे मला
आईलाही ते समजलेलं होतं.

ज्याच्याशी मी लग्न ठरवीन ना?
त्याच्यात यातलं काहीतरी असेलच.
त्याच्याशी संसार करण्याची हिंमत द्या मला

माणसं तर चांगलीच असतात ना, बाबा
त्यांच्यातलं चांगूलपण शोधायचं, तुम्हीच सांगितलेलं
तरी त्याचं माझं जमलं नाही तर?

लग्न म्हणजे काही आयुष्याची इतिकर्तव्यता नाही.
समजा माझी निवड चुकली तर
मी परतून येईन.
तुमच्या गळ्यात पडून आणि आईच्या कुशीत शिरून पोटभर रडेन,
आणि पुन्हा एकदा उभी राहीन.
तुम्ही फक्त माझ्याबरोबर असा.
आणि हो, माझी काळजी नका करू.
विश्वास ठेवा माझ्यावर


-- विद्या

8 comments:

  1. Nice poem.I wish 2 fullfill u r desire

    ReplyDelete
    Replies
    1. तुमच्यासाठी --
      " इंद्रधनु " वरचे सगळे लेख सुरूवातीपासून वाचायला हवे आहेत. :)

      Delete
    2. त्यांना अंमळ उशीर झाला आहे :)
      ’नवी’ कविता ही छान आहे.

      Delete
    3. त्यांना अंमळ उशीर झाला आहे :) >> :D :D :D

      Delete
  2. खूप सुंदर कविता.. आवडली.. खरे तर मला इथे प्रतिक्रिया द्यायची नाहीये.. रादर मला प्रतिक्रिया द्यायचीच नाहीये.. मला अजून काहीतरी म्हणायचे आहे.. ब्लॉग च्या लेखकांशी संपर्क साधायचा आहे.. दुर्दैवाने एकही ठिकाणी कोणाचाही इमेल आयडी वैगेरे सापडला नाही.. :(
    निदान सगळ्या ब्लॉगचा मिळून तरी एखादा इमेल आयडी बनवा आणि द्या.. किंवा तुमच्यापैकी कोणाचाही...

    ReplyDelete
    Replies
    1. asvvad@googlegroups.com
      या पत्त्यावर आमच्याशी संपर्क साधता येईल.
      स्वागत आहे.

      -- इंद्रधनु

      Delete
    2. मेल केली आहे.. चुभूदेघे... :)

      Delete
  3. मला अशी बायको हवी, अश्या बायका हव्या.

    पुरुष तर स्वत:साठीच एकापेक्षा अधिक संबंध ठेवतो ना! त्याच्या सुखाचीच तर ती तजवीज असते. पुरुषाच्या जातीची ही लबाडी भिल्लांच्या एका गाण्यात अगदी आपोआप उघड होते पहा. गाणं रणधीर खरे यांनी गोळा केलेल्या संशोधनपूर्वक संपादित केलेल्या आणि उत्तम इंग्रजीत अनुवादलेल्या अनेक भिल्ल गीतांपैकी एक आहे. मराठी अनुवाद अरुणा ढेरेंचा.

    एक नवरा आपल्या बायकोशी अगदी प्रेमानं बोलतो आहे.

    किती बारीक आणि सुंदर तुझी कंबर!
    पाण्याच्या घागरी न् गवताचे भारे वाहणं
    शेतातल्या पिकाची झोडपून मळणी करणं
    सोसणार नाही गं तुला, सोसणार नाही.
    किती कोवळे, पालवीसारखे तुझे हात!
    उन्हानं कडक न् पावसात धारदार
    कसा तू ओढशील पोहऱ्याचा दोर?
    सोसणार नाही गं तुला, सोसणार नाही.
    किती नितळ आणि नाजुक तुझे पाय!
    मैल न् मैल चालणं, लाकडं गोळा करणं
    आणि पुन्हा घराकडे पायपीट करत येणं
    सोसणार नाही गं तुला, सोसणार नाही.
    तू तर अश्शीच देखणी हवीस मला
    अजिबात ताण न् कष्ट नकोत तुला
    म्हणून मी आणीन एक बाईलच करून
    उन्हा पावसात राहील जी घट्ट तग धरून
    जी हंडे उचलील न् गवत कापील
    शेतावरच्या धान्याची मळणीही करील
    तुझा माझा स्वैपाक करील, तुझी-माझी पोरं वाढवील,
    त्रास तुला कसलाच होणार नाही गं, होणार नाही.

    ReplyDelete

हिरो

  माझ्या मैत्रिणीची एक मैत्रीण आहे. क्लार्क. आपलं काम प्रामाणिकपणे करणारी. कधीही कुठल्या कामाचे वरून किंवा टेबलाखालून असे पैसे तिने घेतले ना...