Thursday, May 12, 2011

भारतीय स्त्रीचे गृहिणीकरण -- १



इंग्रज भारतावर राज्य करत होते. भारताला लुटत होते. स्वत: ’सभ्य लोकांचा देश’ म्हणून मिरवत होते. भारतावर राज्य करण्यासाठी त्यांना काहीतरी नैतिक कारण हवं होतं. कुठल्याही देशाची संस्कृती किती पुढारलेली आहे हे ठरवण्यातले महत्त्वाचे मापक तिथल्या स्त्रियांची स्थिती कशी आहे? हे आहे. आपल्याकडे सती, केशवपन असल्या प्रथा त्यामुळे सारे भारतीय हे रानटी अवस्थेत आहेत आणि त्यांच्या उद्धारासाठीच इंग्रज हे भारतावर राज्य करीत आहेत, अशी ही भुमिका होती.
 त्या विरोधात इथल्या आणि काही पाश्चात्य इतिहासकारांनी पूर्वी म्हणजे प्राचीन काळी गार्गी, मैत्रेयी यांचे दाखले देत तेव्हा भारतात स्त्रिया पुरूषांच्या बरोबरीच्या होत्या, नंतरच्या काळात मध्ययुगात विशेषत: मुस्लिमांच्या आक्रमणानंतर इथल्या स्त्रियांची स्थिती खालावली अशी एक इतिहासाची रचना समोर आणली.
 आमचा इतिहास गौरवाचाच आहे, अशी भूमिका घेतली. भारतीयांना उभं राहण्यासाठी ती गरजेची होती.
इंग्रजांनी जर आमच्यावर सत्ता गाजवायला नको असेल तर आपण आधी आपल्या स्त्रियांची स्थिती सुधारली पाहिजे असं नवशिक्षितांना आणि सुधारकांना वाटायला लागलं.
 मग व्हिक्टोरीयन इंग्रजी गृहिणी ही प्रमाण मानून इथल्या स्त्रीचं गृहिणीकरण सुरू झालं.
पहिल्यांदा हे बंगालमधे झालं आणि नंतर हे महाराष्ट्रात सुरू झालं.
 स्त्रियांनी शिकलं पाहिजे, सुधारलं पाहिजे असं ठरवलं गेलं.
स्त्रीचं काम काय? तर मुले सांभाळणं, त्यांच्या शिक्षणाकडे लक्ष देणं, शिवण - टिपण करून घर व्यवस्थित ठेवणं वगैरे वगैरे.
स्त्रीने शिकायचं का? तर मुलांना शिक्षित आई मिळावी म्हणून. मुलांवर चांगले संस्कार व्हावेत म्हणून. तिने यासाठी गणित, शास्त्र हे शिकण्याची गरज नाही, तिने गृहविज्ञान शिकावं.
 तिने वावरायचं कसं, बोलायचं कसं हे ही ठरवलं जावू लागलं.
...........................................................

******

आपण का शिकायचं? शिक्षण म्हणजे काय बरं? आपण का शिकलोय?.....

*******

1 comment:

  1. आपण का शिकायचं? >> ज्या कारणासाठी पुरुष शिकतात त्याचं कारणांसाठी.. ज्ञानार्जन, अर्थार्जन, स्वाभिमान, प्रतिष्ठा इत्यादींसाठी.. (इतरांना काहीही वाटू दे, आपण याच कारणांसाठी शिकायचं)

    शिक्षण म्हणजे काय बरं?>> हा आपल्या देशात एक अत्यंत वादाचा मुद्दा होऊ शकतो. इथल्या शिक्षण पद्धतीवर ताशेरे ओढायची हि जागा नाही.. त्यामुळे सध्या तरी आपल्या देशात ज्याला सर्वसामान्यपणे शिक्षण म्हणतात ते शालेय शिक्षण, कॉलेज, पदव्युत्तर शिक्षण इत्यादीला शिक्षण म्हणता येईल ज्याला बाहेर एक ओळख (रेकगनिशन) आहे. (याखेरीज व्यवहारी कामकाज शिकणे, स्वत:ची कामे करायला शिकणे यालाही अनौपचारिक शिक्षण म्हणता येईल)

    आपण का शिकलोय? >> वर सांगितल्याप्रमाणे ज्या कारणासाठी पुरुष शिकतात त्याचं कारणांसाठी.. ज्ञानार्जन, अर्थार्जन, स्वाभिमान, प्रतिष्ठा इत्यादींसाठी..

    मुलांना शिक्षित आई मिळावी म्हणून. मुलांवर चांगले संस्कार व्हावेत म्हणून.>> मुलांवर चांगले संस्कार होण हे साईड इफेक्ट्स (चांगल्या अर्थाने) झाले.. पण तेवढे एकच कारण नाही.. आणि सुशिक्षित असणे आणि सुसंस्कृत असणे यातला फरक आपण जाणतोच. शिवाय १२वि शिकलेली आई आणि एम.कॉम झालेली आई यांच्या संस्कार यात काय फरक असू शकतो?

    तिने यासाठी गणित, शास्त्र हे शिकण्याची गरज नाही, तिने गृहविज्ञान शिकावं. >> आपण काय शिकव आणि काय शिकू नये हे ठरवण्याचा अधिकार सो कॉल्ड संस्कृतीरक्षक लोकांना नाही. लोकांना बायका हि काय पब्लिक प्रोपर्टी वाटते कि काय कुणास ठाऊक? तिने काय कराव आणि काय करू नये हे समाजच ठरवत असतो बहुतेकदा..

    ReplyDelete

हिरो

  माझ्या मैत्रिणीची एक मैत्रीण आहे. क्लार्क. आपलं काम प्रामाणिकपणे करणारी. कधीही कुठल्या कामाचे वरून किंवा टेबलाखालून असे पैसे तिने घेतले ना...