नवरा - बायको किंवा कुठल्याही स्त्री - पुरूषांमधली नाती ही खूप गुंतागंतीची असतात. त्या सगळ्या नात्यांना समाजमान्यता लागते. त्यात बर्याचशा आर्थिक बाबी असतात.
हरीयाणात नवरा गेल्यावर त्या बाईचं धाकट्या दिराशी लग्न लावलं जात असे. याला कारण जमीन त्याच घरांत राहाणे आवश्यक. आपल्याला हे खूप विचित्र वाटलं तरी त्या अख्ख्या समाजाची त्याला मान्यता होती / आहे.
केरळात / दक्षिण भारतात मामाशी लग्न करायची प्रथा होती / आहे. या प्रथेची मुळं मातृसत्ताक पद्धतीत आहेत.
आपल्याकडे महाराष्ट्रात ’ विधवाविवाहाला मान्यतेचा कायदा’ आला. समाजाच्या वरच्या स्तरांतल्या / वरच्या जातीतल्या विधवांसाठी हा आधुनिक असला तरी खालच्या समाजातील स्त्रियां एक नवरा गेल्यावर सहजच दुसरा करीत. किंवा पहिल्या नवर्याशी पटत नसेल तर त्याला सोडून दुसर्याशी घरोबा करीत. याला समाजमान्यता होती. त्यांचं पोट हातावर, इस्टेटीसाठीची भांडणे नाहीत, स्त्रिया स्वत: कमावतात त्यामुळे हे स्वातंत्र्य त्यांना मिळत होतं.
इंग्रजांनी लग्न कायदेशीर केले. त्यामुळे लग्नविधी निश्चित केले गेले. अर्थातच उच्च जातीतले लग्नविधी हेच प्रमाण मानले गेले, त्यामुळे हे ब्राह्मणी विधी सगळ्या जातींवर लादले गेले. त्यामुळे उच्च जातीतल्या स्त्रियांना काही सुरक्षितता मिळाली असेल पण खालच्या जातीतल्या स्त्रियांना त्याचा काच झाला. त्यांच्यातली सहज लग्न होणे आणि मोडणे, पुन्हा करणे या बाबी अवघड होऊन बसल्या. शिवाय पातिव्रत्याच्या कल्पनाही झिरपत झिरपत खाली गेल्या.
तर स्त्री-पुरूष नाती, जी आपल्याला भावनेवर वगैरे आधारलेली ्वाटत असतात ती अशी कायदा, समाज, कुटूंब , आर्थिक स्तर, इस्टेट यांवर आधारित असतात.
अर्थात यातूनही काही नाती फुलतात.
****
नवरा - बायकोच्या नात्यात त्यांच्या एकमेकांविषयीच्या अपेक्षा या अशा बाहेरच्या समाजाने ठरवलेल्या असतात हे जर लक्षात आले तर आपण मुळापासून विचार करू शकू.
****
मान्य. पण फारच थोडक्यात झालंय. हे मुद्दे सविस्तर आणि मुळापासून मांडल्याशिवाय ऐकुन घेतले जात नाहीत. (सविस्तर मांडल्यानंतरही ऐकुन घेतले जातील याची खात्री नाहीच.)
ReplyDeleteखरंय!
ReplyDeleteकधीतरी सविस्तर लिहिन.
(कोणी ऎको न ऎको आपण मांडत राहिलं पाहिजे.)