थप्पड पाहिला, आवडला. जरूर पाहा.
ज्या संयतपणे आणि संथपणे घेतला आहे, आवडलं.
थप्पड खाल्ली आणि तडकाफडकी माहेरी निघून गेली असं नाही होत. ती चार दिवस जाऊ देते हळूहळू तिला उमजायला लागतं, मग ती ठरवते हे शक्य नाही. तिची साधी, सोपी , थेट उत्तरे आहेत. " मी जेव्हा आनंदी आहे असं म्हणीन तेव्हा मी आनंदी असले पाहिजे."
" माझं तुझ्यावर प्रेम नाही उरलेलं , मी तुझ्याबरोबर नाही राहू शकत"
एका थपडेमुळे तिला सगळं दिसायला लागतं, जे की ती चालवून घेत होती.
तो एक थप्पड मारतो त्यामागे काय काय आहे? तोल गेला, राग आला, म्हणून बॉसला थप्पड नाही मारत, पण बायको आहे तर हक्क आहे , मारू शकतो. बेभान झाला तरी काही भान सांभाळून आहेच!!
एका थपडेने तिला जागं केलं तसं त्याला केलं नाही, ही खरी शोकांतिका आहे.
त्याला बिचार्याला काही कळलंच नाही. ना तो विचार करू शकला, ना समजून घेऊ शकला. त्याला साधं नीट सॉरी म्हणायला देखील जमलं नाही.
सिनेमातला काही ढोबळपणा आवडला नाही काही आवडला. कामवाली बाई शेवटी जेव्हा नवर्याला उलटून थपडा मारते ते पाहायला आवडलं. का? मनात हिंसा चालते का आपल्याला?
तिने जर भर पार्टीत उलटून नवर्याला थप्पड मारली असती तर काय झालं असतं? गोष्ट कशी बदलली असती?
आपण एक समाज म्हणून अहिंसेकडे जात असू, जायला हवं, तर मनातल्या " हिंसेचं " काय करायचं? हे आपण शिकायला हवं.
शेवटी एखादी नावडती गोष्ट घडली तर दोघांनीही मिळून शिकायला हवं. लग्नात मिळून शिकणं हवं की नको? नाहीतर लग्न कशाला चालू ठेवायचं? 😊
खरंय!
या येत्या महिलादिनानिमित्त सगळ्या जोडप्यांना मिळून शिकणं जमायला लागो.
त्यासाठी सर्वांना शुभेच्छा!!!
-- विद्या