आम्ही एका मिश्र गटात गप्पा मारत होतो. चर्चा चाललेली. नोकरी करणारी, वरच्या पदावर असणारी बायको पुरूषांना चालते का? असं काहीतरी चाललेलं.
तिथे गप्पांमधे लग्न होऊन सहा-सात वर्षे झालेली एक मुलगी काय बोलली ते मला तुमच्यापर्यंत पोचवावसं वाटतं आहे.
ती म्हणाली, " मी एका पारंपारिक घरातून आले आहे. समानतेच्या, माझ्या हक्काच्या बर्याच गोष्टी मला नवर्याने शिकवल्या. मुलगी लहान दोन वर्षांची असताना, तिच्यासाठी नवरा पूर्णवेळ घरी होता. मुलीला छान सांभाळत होता, घरही सांभाळत होता. मी घरी आले की लगेच घर, मुलगी माझ्या ताब्यात, असं नव्हतं. रात्री उठायला लागलं तर, मुलीचं आजारपणही त्याने बघितलं. आता तो नोकरी करतोय आणि मी मुलगी, घर सांभाळते आहे."
माझं सासर पुरोगामी विचारांचं आहे.
एकदा माझ्या नवर्याच्या मित्राच्या लग्नाच्या स्वागत-समारंभाला मी एकटीच सासरी गेलेले, मी आणि माझे सासरे समारंभाला गेलो. जेवण झाल्यावर सासरे म्हणाले, " मी निघतो, तुमच्या गप्पा चालू देत." मी नवर्याच्या मित्रमैत्रिणींबरोबर गप्पा मारत बसले, पान वगैरे खायला गेलो. निघू असं म्हणून पाहिलं तर रात्रीचे दोन वाजलेले! मी घाबरले. नवर्याच्या मित्राला सोबत घेऊनच घरी आले. उद्या काय ते पाहू, असा विचार करून माझ्या खोलीत झोपायला गेले. तिथून मध्यरात्री नवर्याला फोन लावला आणि काय झालंय ते सांगितलं. "माझं चुकलं, गप्पांच्या नादात घड्याळाकडे लक्षच गेलं नाही." नवरा म्हणाला, "एव्हढं काय टेन्शन घेतेस? काही झालेलं नाही." ती म्हणाली , " मी काय सांगतेय ते त्याला कळतच नव्हतं.
दुसर्या दिवशी काय कोसळणार? याची मला कल्पना आली. सासरी आलेले असताना, त्यात नवरा सोबत नसताना, खुशाल त्याच्या मित्रांबरोबर (फक्त एका मित्राची बायको होती.) रात्री दोनपर्यंत सुनेने गप्पा मारत बसावं. तेही बाहेर, आणि अपरात्री परत यावं. सगळंच गंभीर होतं. ती म्हणाली, " मी विचार केला की कोणी ओरडायच्या आत आपणच सॉरी म्हणून धार कमी करावी. चुकलेलं तर आहेच!"
सकाळी उठल्यावर ती सासर्यांकडे गेली आणि त्यांना ’सॉरी’ म्हणाली. त्यांनी विचारलं, "सॉरी कशाबद्दल? माझ्या मुलाला या घरात जेवढे अधिकार आहेत, तेव्हढेच तुलाही आहेत. तो रात्री दोनपर्यंत गप्पा मारून घरी येऊ शकतो तर तू का नाही? हो, प्रश्न तुझ्या सुरक्षिततेचा आहे. तर या सगळ्या मुलांना मी लहानपणापासून ओळखतो, ते पोचवायला येणार, मग काळजी कसली?"
.........
अशीही काही घरं आहेत.....
अशीही काही माणसं असतात......
तुमच्यापर्यंत पोचावं म्हणून.....
(क्रमश:)