Tuesday, January 25, 2011

सासू-सून- मुलगा....माझा विचार

मूळात कोणतीही दोन माणसे.... त्यांचे विचार वेगळे,जगण्याची उद्दीष्टे वेगळी,पद्धती वेगळ्या,आवडी-निवडी वेगळ्या.हे आपण जर समजावून घेत असू तर आपली अपेक्षा अशी असते की समोरच्याने पण तसाच आपल्या सारखा विचार करावा. आणि यामध्ये फरक पडत असेल तर मतभेद, वादविवाद यांना सुरुवात होते. मग ते नातं कोणतही असो.भाऊ- बहीण, आई-मुलगी, नणंद-भावजय,सासू-सून,नवरा-बायको आणि अशी अनेक. पण या सगळ्यांमध्ये आपल्याला जास्त प्रमाणात सासू- सून हे नात जास्त डोक्यात जातं. मला वाटतं की यामागची कारणं सुद्धा शोधली पाहीजेत. तसा विचार करायला हवा.
नणंद-भावजय.........
आमच्याकडे कौस्तुभला सख्खी बहीण नाही. त्यामुळे नणंद या नात्यापासून मी वाचले. असे म्हणते कारण माझ्या आईच्या आणि माझ्या आत्त्याच्या नात्याच्या आठवणींनी त्या नात्यातील अनुभवाने मी जेव्हा लग्नाला उभी राहीले तेव्हाच आई- बाबांना माझी एक अट घातली की मला एकवेळ दोन-चार दिर असतील तर चालतील पण नणंद नको.नणंद-भावजय या नात्याचीच डोक्यात तिडीक बसली होती. आता तुम्ही म्हणाल की मी कोणाची तरी नणंद आहेच. नक्कीच आहे. आता मलाही भावजय आहे. पण मागील पीढीचा हा अनुभव पाहून त्यानुसार आमच्या दोघींचे नाते जास्तीत जास्त कसे चांगले राहील यासाठीचे वागणे माझ्या हातात आहे.ती नोकरी करते.भावाचे लग्न झाले तसे आईला- बाबांना बसून समजावून सांगितले की आता उटसूट माहेरी येणे,किंवा माहेरच्या कोणत्याही निर्णयात माझे मत ग्राह्य धरणे चुकीचे आहे.ती नव्याने घरात आली आहे तुमच्या चौघांच्या एकमेकांतील नात्याने हे घर फुलूद्यात.त्या आनंदात आम्ही नक्कीच तुमच्या बरोबर आहोत.आणि हे माझ्या आईनेही चांगल्या रीतीने स्विकारले आहे. आणि यामुळेच भावजयीला जर का एखाद्याचे वागणे मग ते माझ्या भावाबद्दल असो, कींवा आई-बाबांच्या बद्दल असो तिचा हक्काने मला फोन येतो आणि यात कोठेही तक्रारीचा सूर नसतो व तो प्रॉब्लेम चुटकीसरशी सामज्यस्याने सोडवला जातो. समजावून घेऊन कोणत्याही नात्याला कोणत्याही नात्याशी मोकळेपणाने एखादी अडचण मांडता यावी असे नाते असावे असे मला मनापासून वाटते.
सासू-मुलगा-सून...........
या नात्यातही रोज छोट्या-छोट्या कारणांवरुन वाद हे होणारच आहेत. सुरवातीला माझं प्रचंड डोकं फीरायचं.आणि त्यातून माझा स्वभाव हा कोणाही बद्दल काही तक्रार न सांगण्याचा. त्यामुळे या स्वभावाने मी मला स्वत:ला आतल्या आत खूपच त्रास करुन घेत असे.माझा चेहराच बघून खूपदा कौस्तुभ मला विचारत असे की काय झालं पण मी त्याला म्हणत होते की तुझ्या पर्यंत काही नाही. याचा अर्थच असा की जरी सासूचे वागणे आपल्याला खटकणारे असले तरी आपण ज्याच्याकडे तिच्याविषयीची तक्रार करणार आहे तो आपला नवरा असण्या आधी तिचा मुलगा आहे.कोणत्याही मुलाला त्याच्या आईविषयी तक्रार ऎकून घेणे हे अपमानास्पद वाटते. रहाता राहीला प्रश्न कोण चूक कोण बरोबर. आणि त्याने कोणाची बाजू घ्यायची.खरंतर सासू-सून वादातील पूर्ण प्रसंग घडताना तो नवरा म्हणजेच सासूचा मुलगा हा त्या प्रसंगाला हजर असणे आणि तो हजर नसताना घडून गेलेल्या वादावर दोघींच्या बाबतीत योग्य निर्णयाने वागणे यात फरक आहे.कारण प्रत्येकजण आपण बरोबर या धारणेने त्या मूलाच्या म्हणजेच नव-याच्या पुढे आपली बाजू मांडत असतो.अश्यावेळी आपल्या भोवतालची परीस्थिती जर वर्षानुवर्षे तशीच रहाणार आहे तर अश्या माणसांचा, अश्या परीस्थितीचा त्रास करुन न घेता त्याने योग्य निर्णय घेणे.हे मला महत्वाचे वाटते.आणि शेवटी सगळ्यात महत्वाचे आपण नवरा- बायको म्हणून जेव्हा दोघेच असतो तो पर्यंत काही नाही. पण जेव्हा मुलं होतात तेव्हा त्यांच्यापुढे, संपूर्ण घराचे मनस्वास्थ्य संभाळणे गरजेचे आहे असे वाटते.
पूर्वी यातलं मला काहीच जमत नव्हतं यातून काय मार्ग काढावा काहीच सुचत नव्हते. याचा परीणाम कौस्तुभवर सतत चिडचिड होत होती.पण एक दिवस शांत बसून विचार केला व त्यातून मार्ग सापडला.आपल्या स्वत:च्या स्वास्थ्यासाठी, आपल्या मुलांसाठी, त्यांचे बालपण आनंददायी रहाण्यासाठी, घर हसतं रहाण्यासाठी, प्रत्येक नात्यातील काही खटकणा-या गोष्टीं नक्की सोडून देऊयात.

7 comments:

  1. mazahi swabhav asach aahe. me pan kunalahi kadhi ultun bolat nahi. sasubai mala bollyawar mala khup tras hoto. tya mazyawar khup aarop kartat. pan kewal tya mazya nawryachya aai aahet ani me pan tyana mummy mhante mug ugach tyana kashala dukhwayche mhanun kahi bolat nahi. pan tya kadhich asa wichar karat nahit. mala asa watatay ki kharach tyana maza kaliz Kadhun dakhwawe ki mazya manat tyanchyabaddal kiti prem ani adar aahe. kay karu kahi kalatach nahi. tyana me nehemi chukichich watate. dushta watate. ata mala khup tras hotoy. mala sahanach nahi hot ata. mala tyanchi khup bhiti watate.tya boltana samorchyala kay watel asa wicharch karat nahit pan khup mayaluhi aahet. bayko aalyawar nawra bighadto ani aai wadilana wisrato he tyanchya dokyat itke basle aahe ki tyani maza swikar kadhi kelach nahi. ani yamule mazya nawryala khup tras hoto.

    ReplyDelete
  2. प्रति,
    अनामिका,
    >> mala sahanach nahi hot ata. mala tyanchi khup bhiti watate.
    तुझ्या या वाक्यांचा मला त्रास झाला. एकीकडे तू मोकळी झालीस याचे बरे वाटले .
    यावर तू काही उपाय का करत नाहीस? किंवा केले असशीलही.
    तू तज्ञांचा सल्ला का घेत नाहीस?
    समुपदेशनाचा फायदा होतो.
    आपण समस्येत अडकलेले असतो तेंव्हा मार्ग काढता येत नाही.
    तटस्थ विचारी व्यक्ती तसा काढू शकते.
    साधे सोपेच उपाय असतात... जादू व्हावी तसा फरक पडतो/ पडू शकतो.

    तुला तणावमुक्त, आत्मविश्वासाने आणि आनंदाने जगता यावं,
    यासाठी आमच्या शुभेच्छा!

    -- इंद्रधनु
    ( विद्या कुळकर्णी)

    ReplyDelete
  3. Vidya tumhi khup chhan ahat. me tumhi lihilele wachle. khup chhan. tumhi mhanalya pramane me yatun marg kadhnyasathi sallahi ghetla. pan mala tya ase mhanalya ki tu khambir ho. tu tyanchyashi bhandu nakos pan ugach tyanche bolne aiku nakos. thodese bolayla shik. pan te mala jamatach nahi. tya gharatlya mothya aahet tyana ultun bolane mala patat nahi.

    maze baba mhantat ki kahi lok na dewane sagale dilele aste pan ranget ubhe rahun dukkh wikat ghetat. aamchya gharat matra nemke hech chalu aahe. sagle agdi chhan asun winakaran dukkh wikat ghetla jatay.

    parwa me nileshla mhanale ki nilesh kharach pralay zala tar bara hoil sagla tras sampel. pan te mala mhanale ki ag mala jagaychay jiwnat khup kahi karaychay ani tyasathi tu havi aahes. nilesh mhantat ki mummyla tu kashi aahes he nakki kalel.tu matra aahe tashich raha swatala badlu nakos. maza tuzyawar wishwas aahe.

    mhanunach me tharawlay ki mummyncha swabhav ani wichar badlne mazya hatat nahi na mug me tyacha swatala tras karun ghenar nahi. karan me changli wagunhi jar tyana mazyat doshch disat astil tar tyat me kahich karu shaknar nahi.

    me ata swatasathi jagnar aahe. mala aaj kharach khup mokla watatay. tumchyashi bolun karach khup chhan watatay. thanks a lot

    ReplyDelete
  4. >>me ata swatasathi jagnar aahe.
    वा! छान!
    तुम्हां दोघांत संवाद आहे, ही किती चांगली गोष्ट आहे!
    काही सूचवू का?
    तू जे दु:ख विकत घेण्याविषयी लिहिलेस त्यावरून...
    तुला जो त्रास होतोय त्याचे कारण फक्त सासूबाईच आहेत का? की आणखी काही आहे? शोधून काढ.
    काही दु:खे समाजमान्य नसतात, ती मांडताच येत नाहीत.

    परीस्थिती पूर्णपणे बदलता येतेच असं नाही,
    बोललो की आपण थोडे पुढे जातो, समस्या सुटण्याच्या दिशेने,
    जी बदलता येणार नाही ती परीस्थिती स्वीकारण्याच्या दिशेने,
    साचत गेलेलं कुठेतरी मोकळेपणाने बोलता आलं पाहिजे.
    मैत्रिणींशी, मित्रांशी,.... हात लांबवून पहा.

    आम्हीतर इथे आहोतच.
    शुभेच्छा!

    ReplyDelete
  5. apan bollo ki thode pudhe jato, samasya sutnyachya dishene. ji paristhiti badalta yenar nahi ti swikarnyachya dishene. he kharach mala khup patale aahe. bolun khup halke watate ani shaktihi milte.
    tumchyashi bolun kharach jawalchya maitrinishi bolalyasarkha watatay.thanks

    ReplyDelete

हिरो

  माझ्या मैत्रिणीची एक मैत्रीण आहे. क्लार्क. आपलं काम प्रामाणिकपणे करणारी. कधीही कुठल्या कामाचे वरून किंवा टेबलाखालून असे पैसे तिने घेतले ना...