स्वयंपाक हा खरोखरच बायकांच्या दृष्टीने खूपच महत्वाचा विषय आहे.
..............................................................................................
मला लग्न होईपर्यंत प्राथमिक स्वरुपातच स्वयंपाक येत होता. म्हणजे उपाशी राहणार नाही एवढ्यापुरता. पण त्यामुळे एक फायदा असा झाला की को-या पाटीमुळे सासरकडील चवीचे पदार्थ त्यांच्या पध्दतीप्रमाणे शिकण्यास सुरुवात झाली. त्यामुळे स्वयंपाक घरात सासू सुनेमधे तुझी माझी पध्दत अशी येणारी टसल आलीच नाही. एखादा पदार्थ आयता मिळत असेल तर त्याच्या चवीला फारसे प्राधान्य माझ्या लेखी नव्हते. त्यामुळे केलेल्या स्वयंपाकाचा मनमुराद आस्वाद घ्यायचा आणि जाताजाता थोडं फार शिकायचं या भूमिकेत मी असायचे. घरात कुटुंबही लहान असल्याने माझी अंदाजक्षमता जास्तीजास्त ४-५ माणसांपर्यंत मर्यादित असायची. माझ्या परिचयाच्या काही जणी आहेत. त्यांचा स्वयंपाकाबाबतचा आत्मविश्वास मला नेहमी न्यूनगंड देणारा आहे. म्हणजे. मी १५-२० माणसांचा स्वयंपाक कसा झटपट करु शकते ते सुध्दा कुठल्याही पदार्थाची चव न घेता हे मला मोठ्या दिमाखात ऎकवतात. (एथे चविष्ट पदार्थ करण्याच्या संकल्पनेला फारसं महत्व नसावं हे मला नंतर जाणवायचं.)
आनंदला स्वयंपाकातील पदार्थ करण्याची आवड आहे. पण नोकरीच्या व्यापामुळे रोजचा रोज सहभाग जमत नाही. सुट्टी च्या दिवशी मात्र तो आवर्जून एखदा पदार्थ करण्यात सहभाग घेतो.
स्वयंपाकाच्या बाबतीत बोलायचं झालं तर आवड म्हणून करणं आणि इलाज नाही म्हणून करणं ह्यामुळे येणा-या मानसिकतेबाबत घरातील सगळ्यांनाच त्याची जाणीव असेल, त्यासाठी सहकार्य असेल तर मग "स्वयंपाकघर - एक भन्नाट प्रयोगशाळा" म्हणून त्याची मज्जा घेताच येईल.
म्हणजे वेगवेगळ्या अंगांनी त्याबाबत विचार होऊ शकतो. जसं अत्यंत आवडीने करणं, पर्याय नाही म्हणून करावा लागणं, ते आपलं कर्तव्य आहे असं समजून करणं, किंवा अगदी टोकाचा भाग म्हणजे रोज हॉटेलात जाणं शक्य नाही म्हणून इलाज नाही म्हणून करणं.
स्वयंपाक करणं ही प्रामुख्याने बाईची जबाबदारी आहे अशी एक सर्वमान्य धारणा आहे. म्हणजे घरी जेवायच्या वेळा झाल्या की घरच्या बाईकडे "हे काय अजून जेवायच तयार नाही" हे जितकं हक्कानं बघितलं जातं तितकं पुरुषा कडे बघितलं जात नाही.