tag:blogger.com,1999:blog-7426170583171145379.post5400467613802631213..comments2024-03-08T14:25:03.326-03:30Comments on इंद्रधनु: -o-o-o-विद्या कुळकर्णीhttp://www.blogger.com/profile/03755681362166891097noreply@blogger.comBlogger1125tag:blogger.com,1999:blog-7426170583171145379.post-84621762701611854312010-05-13T02:49:54.209-02:302010-05-13T02:49:54.209-02:30खूप आवडलं.
काही वर्षांपूर्वीपर्यंत performance ap...खूप आवडलं.

काही वर्षांपूर्वीपर्यंत performance appraisal मध्ये तुमचे weakness लिहून ते कसे दूर करणार याच्यासाठीचे मुद्दे असायचे.
आता असं म्हणताहेत की या उणीवा तर असणारच आहे. त्यापेक्षा महत्वाचं हे आहे की strengths ओळखून त्यांचा वापर करुन घेणं..

स्वत:पलिकडे जाउन इतरांना समजून घेणं / empathy ही बाईपणाची खूप मोठी देणगी आहे. ..
ही देणगी खरंच नैसर्गिक आहे का असं बिंबवण्यात पुरुषी समाजव्यवस्थेचा डाव आहे हा अर्थातच वादाचा मुद्दा.

तू उल्लेख केलेल्या ’घर’ सावरणार्याव, पेलणार्याा बायका बहुतेकांनी पाहिल्या/अनुभवल्या असतीलच.
आपल्या आधीच्या पिढ्यांमध्ये हे जितकं दिसलं तितकं आत्ता दिसतं आहे का ? (आपली वर्तुळं बदलली म्हणून आपल्याला दिसत नसेल ही शक्यता आहेच अर्थात). एकाएकी पुरुष जास्त जबाबदार झालेत की मीच एकटीनं का हा गाडा ओढायचा असं आत्मभान येऊ लागलंय..

व्यवस्थेचे चटके पुरुषांनाही सोसावे लागतात हे खरंच पण बाईला जास्त सोसावे लागतात आणि बाई म्हणून सोसावे लागतात हेही खरं. ज्या पुरुषांना जी काय हताशा येते त्याची जबाबदारी कोणाची हे ठरवता येत नाही आणि म्हणून ते निर्गुण निराकार नैराश्याशी झुंजत असतात. बाईला मात्र या सगळ्या अन्यायी व्यवस्थेचा प्रतिनिधी समोर सगुण साकार दिसत असतो आणि “माझं हे असं कारण तू/तो हा असा” ही एक मलमपट्टी उपलब्ध असते. त्याने घाव अर्थातच भरत नाहीत हे नक्कीच पण घाव घालण्याला प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष जबाबदार कोण हे तरी माहीत होतं ..

(ता.क. वरती दोन पिढ्यांची तुलना केली म्हणून काही वर्षांपूर्वी वाचलेल्या एका पुस्तकाबद्दलच्या लेखाची आठवण झाली.
गूगल वर शोधून पाहा. What our Mothers didn't tell us: Why Happiness eludes the Modern Woman. अमेरिकन संदर्भ आहे. मी पुस्तक वाचलेलं नाही. लेख वाचला आहे. Alternate viewpoint म्हणून मह्त्वाचा आहे.)मिलिन्द बामhttps://www.blogger.com/profile/03639176509485470961noreply@blogger.com