tag:blogger.com,1999:blog-7426170583171145379.post3641354414726479271..comments2024-03-08T14:25:03.326-03:30Comments on इंद्रधनु: थोडेसे मनातले....विद्या कुळकर्णीhttp://www.blogger.com/profile/03755681362166891097noreply@blogger.comBlogger6125tag:blogger.com,1999:blog-7426170583171145379.post-66486500978402089232013-06-23T00:03:49.088-02:302013-06-23T00:03:49.088-02:30पूजा, लिहिलंस हे आवडलं.
तू जे चित्र रंगवलं आहेस, ...पूजा, लिहिलंस हे आवडलं.

तू जे चित्र रंगवलं आहेस, ते मी अनुभवलेल्या अमेरिकेत, तिथे राहणाऱ्या भारतीय कुटुंबात सार्वत्रिकपणे दिसणारं आणि बऱ्यापैकी प्रातिनिधिक असंच आहे. H4 वाल्यांची शल्यं, तिथल्या हिवाळ्यात त्यांना ग्रासून टाकणारा भयानक अंतर्बाह्य सुनेपणा, गाडी येत नसली की येणारं पांगळेपण, हे सगळं वास्तव आहे.

तरी वाचताना असं वाटलं की, (लेखातील) दृष्टीकोन एकांगी आणि निराशावादी तर होत नाही आहे ना? आता साचलेलं बाहेर काढण्यासाठी, मोकळं होण्यासाठी जरूर लिही. सहानुभूतीसाठी, निराशेचं समर्थन करण्यासाठी लिहिलं जात नाही आहे ना, हे पहा.

इथे भारतात बसून मला काहीही सांगणं सोपं आहे, हे माहीत असूनही असं सांगावंसं वाटतंय की, परिस्थिती कशीही असली तरी "ती अशी आहे, अशीच असणार आहे आणि आता मला ती निमुटपणे स्वीकारायची आहे, तडजोडच करायची आहे" असं असण्याची काही गरज नाही. "मला इथे काही करता येत नाही, येणार नाही" हा विचार उरावर बसला असेल तर त्याला पलटून "इथल्या परिस्थितीत मला काय काय करता येईल" असा विचार घेऊन तू परिस्थितीच्या उरावर बसायला हवं आहे.

काय करू शकतेस हे तुझं तुलाच शोधायला हवं, पण सुरुवात करायला volunteering (there are some catches for H4 holders there too) हा एक उत्तम मार्ग असू शकतो. काही नाही तर एक सकारात्मक प्रश्नावली बनवून H4 वाल्यांचा एक survey तू घेऊ शकशील आणि त्यातून कितीतरी कल्पना तुझ्यासमोर येऊ शकतील.

अमेरिकेतील सकारात्मक गोष्टींबद्दलही लिहिलंस ते छान केलंस. पण तू लिहिल्या आहेस त्या सगळ्या वरवरच्या गोष्टी आहेत. अमेरिकेच्या गाभ्यातल्या सकारात्मक गोष्टी शोध, काही अगदी विशेष आणि अगदी दुर्मिळ अशा आहेत. त्यांचा तू कसा वापर करून घेऊ शकशील हे पहा.

आगंतुक उपदेशाबद्दल क्षमस्व.
नीरज पाटकरhttps://www.blogger.com/profile/02423169302316891011noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7426170583171145379.post-50612192916803450142013-06-22T11:46:14.320-02:302013-06-22T11:46:14.320-02:30Very well said. Online education could be an optio...Very well said. Online education could be an option if you are interested taking courses but not a full time degree. Please visit this thread- http://www.maayboli.com/node/35109. Some very useful information is given in the article as well as comments. Good luck :)तृप्तीhttps://www.blogger.com/profile/08345803513063236681noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7426170583171145379.post-5996542628397358582013-06-22T09:07:08.034-02:302013-06-22T09:07:08.034-02:30आत्तापर्यंत माझ्या डिपेंडंट विसा वर अमेरिकेला गेले...आत्तापर्यंत माझ्या डिपेंडंट विसा वर अमेरिकेला गेलेल्या मैत्रिणीचा खूप हेवा वाटायचा. ती फेसबुक वर छोटे छोटे कपडे घालून मस्त फोटो टाकायची/ टाकते तेव्हा वाटायचे, किती मस्त आहे तिचं लाईफ.. फुल प्रायव्हसी आणि स्वातंत्र्य..
आता हे वाचून तिची दया यायला लागलीये.

पूजा नक्की काहीतरी करत रहा. तुझ्यातली "तू" हरवू देऊ नकोस. शक्य असेल तर छोटे छोटे कोर्सेस जॉईन कर. छंदवर्ग वगैरे लाव. गाणं, नाच, ड्रायव्हिंग, कोणतीही कला इ. शिक. लवकर इकडे परत यायला मिळेल. आणि हो, शक्य असेल तर मायबोली. कॉम नावाचं एक मराठी संस्थळ आहे. ते जॉईन कर. तुझा वेळ एकदम मजेत जाईल. पियू परी :)https://www.blogger.com/profile/01497296465751053629noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7426170583171145379.post-42823581995294665982013-06-21T10:16:08.974-02:302013-06-21T10:16:08.974-02:30पूजा,
मोकळेपणाने मांडलं आहेस. ते खूप आवडलं.
खरोख...पूजा,

मोकळेपणाने मांडलं आहेस. ते खूप आवडलं.

खरोखर कितीतरी मुली अशाप्रकारे अमेरिकेत वास्तव्यास जातात आणि मग त्यांच्या स्वत:बद्दल विचार करायला विसरायला लागतात किंवा तडजॊड करतात. काहीजणींना ती तडजोड स्वत:ची समजूत घालून स्विकारता येते. पण मनाचा एक कप्पा मात्र दु:खी ठेवूनच.

एवढ्या प्रगत देशात तू वेगवेगळ्या गोष्टींचा अनुभव घेतलास. छानच. त्याबद्दल जरुर लिही.

> पण एक मात्र खरं होतं की मला मीच हवी होते.....!
खूप आवडलं.
वैशालीhttps://www.blogger.com/profile/13205546472503052648noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7426170583171145379.post-78350001634268647592013-06-21T03:38:37.296-02:302013-06-21T03:38:37.296-02:30पूजा,
मनापासून आणि मनातलं लिहिलं आहेस.… खरंच अभिनं...पूजा,
मनापासून आणि मनातलं लिहिलं आहेस.… खरंच अभिनंदन!
हे असंही असू शकेल असं माहितीच नव्हतं. लग्न करून नवऱ्याबरोबर अमेरिकेला जाणाऱ्या मुलींबद्दल 'वा' असंच वाटायचं.
तुझं लिखाण वाचून एक नवीन भुंगा शिरलाय डोक्यात....
माझ्या नात्यातली एक gold medalist आयुर्वेदिक डॉक्टर आहे, जी लग्न झाल्यावर परदेशी गेली आहे आणि तिथे तिला काहीच करता येत नाहीये. तिच्याबद्दल हे मी ऐकलं होतं पण त्याची तीव्रता आता जाणवतेय.
मनात येतंय तर लिहित रहा. स्मिताhttps://www.blogger.com/profile/09633501357899427965noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7426170583171145379.post-351399651238268782013-06-21T01:15:01.892-02:302013-06-21T01:15:01.892-02:30पूजा,
अभिनंदन!
लिहायचं ठरवलंस आणि लिहिलंस ...पूजा,
अभिनंदन!
लिहायचं ठरवलंस आणि लिहिलंस यासाठी!
तू माझी लाडकी जाऊ आहेसच, पण तू कसा विचार करते आहेस, हे पहिल्यांदा कळले म्हणून अजून आवडते आहेस.
तुझ्या लिखाणातल्या काही काही गोष्टी मला फार आवडल्या.
>> पण एक मात्र खरं होतं की मला मीच हवी होते.....!
हे सगळ्यात आवडलं. हे तुला कायमसाठी हवं असू दे.
>> इथे राहून काय केले? काहीच नाही.
"काहीच नाही" म्हणजे काय ? याचा विचार करते आहेस , हे आवडलं.
पुण्यात राहणार्या बायकाही ’फार काही’ करत असतील असं नाही.
आपण काहीतरी करत असायला हवं, याचा विचार करते आहेस, छान.
>>"पूजा आपण म्हणजे शिकली सवरलेली घर कामाची बाईच आहोत कि ग इथे".तेव्हा खूप हसलो आम्ही दोघीजणी,फोन ठेवल्यावर भरूनच आलं दोघीनाही,तिने २ मिनिटात पुन्हा फोन केला व म्हणाली यासाठी नव्हतो ना ग आलो आपण इथे....!मग का आलो होतो आपण इथे माहित नाही.
हे वाचताना भरूनच आलं, मलाही.
भारतातही खूप बायका तेवढंच करतात.

आता लिहायला सुरूवात केली आहेस तर लिहित राहा,
काय पाहते आहेस, काय जाणवतंय?, काय खटकतंय? लिही.विद्या कुळकर्णीhttps://www.blogger.com/profile/03755681362166891097noreply@blogger.com